कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात फूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 04:42 PM2018-05-19T16:42:50+5:302018-05-19T16:42:50+5:30
राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना रिक्त पदांवर शैक्षणिक अर्हतेनुसार कायमस्वरुपी सवेत सामावून घ्यावे, तसेच समान कामास समान वेतन द्यावे या मागण्यांसह ह्यलॉँग मार्चह्ण काढण्यासाठी एकवटलेल्या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संघटनेत फूट पडली आहे. सरकारने समायोजनाच्या मागणीवर सकारात्मक भूमिका घेतल्याचे सांगत एका गटाने आंदोलनात माघार घेतली असून दुसऱ्या गटाने लाँग मार्च करण्यास प्रशासानाने परवानगी नाकारल्याचे कारण देत ह्यलाँग मार्चह्णऐवजी मुंबईतील आझाद उपोषण करण्याचा मार्ग अवलंबला आहे.
नाशिक : राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना रिक्त पदांवर शैक्षणिक अर्हतेनुसार कायमस्वरुपी सवेत सामावून घ्यावे, तसेच समान कामास समान वेतन द्यावे या मागण्यांसह ह्यलॉँग मार्चह्ण काढण्यासाठी एकवटलेल्या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संघटनेत फूट पडली आहे. सरकारने समायोजनाच्या मागणीवर सकारात्मक भूमिका घेतल्याचे सांगत एका गटाने आंदोलनात माघार घेतली असून दुसऱ्या गटाने लाँग मार्च करण्यास प्रशासानाने परवानगी नाकारल्याचे कारण देत ह्यलाँग मार्चह्णऐवजी मुंबईतील आझाद उपोषण करण्याचा मार्ग अवलंबला आहे.
नाशिकमधून मंत्रालयापर्यंत लाँग मार्च काढण्यासाठी नाशिकमध्ये एकवटलेले हजारो कंत्राटी आरोग्य कर्मचारी शनिवारी(दि.१९)पुन्हा माघारी परतले असून काही कर्मचारी रेल्वे, बसेस अशा विविध मार्गाने मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेने शुक्रवारी लॉँग मार्च काढण्याचे नियोजन केले होते. परंतु पोलीस प्रशासानाने मार्च काढण्यास परवानगी नाकारल्याने कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी तातडीने मुंबईत मुख्यमंत्री आणि सचिवांशी चर्चा करण्यासाठी रवाना झाले. या चर्चेत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर एका गटाने लाँग मार्च न करता आंदोनलन मागे घेण्याचे जाहीर करीत माघारी जाण्याची भूमिका घेतली. तर दुसऱ्या गटाने कोणतेही लेखी आश्वासन सरकाने दिलेले नसल्याचे आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी महासंघात मतभेद निर्माण होऊन काही आंदोलकांनी गोल्फक्लब मैदान गाठले तर काहींनी माघार घेऊन परतीचा मार्ग स्विकारला. त्यामुळे आंदोलनात फूट पडून आंदोलकांच्या संख्येत झालेली असताना दुसऱ्या गटानेही लाँग मार्च काढण्यासाठी पोलिसांनी परवानगी नाकारल्याचे सांगत लाँग मार्च करण्याचा विचार मागे ठेऊन मुंबईतील आझाद मैदानावर सोमवारपासून उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, कर्मचाऱ्यांनी लॉँगमार्चचा इशारा दिल्यानंतर दुपारी मुख्यमंत्र्यांनी संघटनेचे पदाधिकारी, आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केलेली आहे. या संदर्भात संबंधित अधिकारी आणि पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार असल्याची माहिती संघटनेचे राज्य उपाध्यक्ष हर्षल रणावरे यांनी दिली आहे.