पर्यावरण समिती आज करणार ब्रह्मगिरीची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:16 AM2021-09-27T04:16:47+5:302021-09-27T04:16:47+5:30
ब्रह्मगिरी पर्वतरांगेतील संतोषा आणि भागडी डोंगरानजीक होत असलेले अवैध उत्खनन तसेच इको सेन्सेटिव्ह झोन असतानाही खोलपर्यंत सुरू असलेले खोदकाम ...
ब्रह्मगिरी पर्वतरांगेतील संतोषा आणि भागडी डोंगरानजीक होत असलेले अवैध उत्खनन तसेच इको सेन्सेटिव्ह झोन असतानाही खोलपर्यंत सुरू असलेले खोदकाम याबाबतच्या तक्रारी असल्याने समितीकडून सोमवारी या सर्व भागाची पाहणी केली जाणार आहे. सकाळी साडेदहा वाजता या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. येत्या ३० तारखेला जिल्हा प्रशासनाच्या पर्यावरण टास्क फोर्सच्या बैठकीपूर्वी हा पाहणी दौरा होणार असल्याने या स्थळपाहणी दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवरच टास्क फोर्सच्या काही उपसमित्यांनीही आपले अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर केलेले आहेत.
या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर सोमवारी होणारा स्थळपाहणी दौरा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ब्रह्मगिरी, सह्याद्रीच्या रांगेत असलेल्या डोंगरांना सुरुंग लावण्याचे प्रकार होत असल्याने येथी जैवविविधता आणि दुर्मीळ वनस्पती वाचविण्यासाठी पर्यावरण क्षेत्रात काम करणारे नाशिककर एकत्र आले आहेत. त्यांच्या प्रयत्नातून जिल्हास्तरीय टास्क फोर्स तसेच पाहणी समिती नियुक्ती झाली आहे. पर्यावरणमंत्र्यांनीदेखील याबाबत लक्ष घातले असल्याने येथील प्रत्येक हालचाल महत्त्वपूर्ण ठरणार आहे.