दिंडोरी नगरपंचायतीतर्फे पर्यावरण जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2021 05:47 PM2021-01-05T17:47:55+5:302021-01-05T17:48:22+5:30

दिंडोरी : महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने सुरु केलेल्या माझी वसुंधरा अभियानांतर्गत दिंडोरी नगरपंचायतीच्या वतीने विविध कार्यक्रम राबवून नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जनजागृती निर्माण केली जात आहे.

Environmental Awareness by Dindori Nagar Panchayat | दिंडोरी नगरपंचायतीतर्फे पर्यावरण जनजागृती

दिंडोरी नगरपंचायतीतर्फे पर्यावरण जनजागृती

googlenewsNext

पृथ्वी, अग्नी, जल, वायू व आकाश या पाच तत्वांच्या समतोल व संवर्धनासाठी भाग घ्यावा यासाठी नववर्षाच्या प्रारंभी हरित कायदा पालन व वसुंधरेच्या रक्षणार्थ नागरिकांना शपथ देण्यात आली. यावेळी जास्तीत जास्त पर्यावरणपूरक साधनांचा वापर सर्वांनी करावा, जेणेकरुन प्रदूषणास आळा बसेल. यासाठी निसर्गाचा समतोल राखण्याचे आवाहन दिंडोरी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी नागेश येवले यांनी केले. विजेवर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी या अभियानांतर्गत नगरपंचायतीमार्फत नाममात्र सहा रुपये प्रती तास या दराने इलेक्ट्रॉनिक बाईक चार्जिग पॉईन्ट उपलब्ध करुन देण्यात आला आहे. शपथ घेण्यासाठी नगराध्यक्ष रचना जाधव, उपनगराध्यक्ष कैलास मवाळ,नगरसेवक भाऊसाहेब बोरस्ते ,शैला उफाडे तसेच नगरपंचायतीचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Environmental Awareness by Dindori Nagar Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.