चित्र प्रदर्शनातून पर्यावरण जागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 03:55 PM2018-11-10T15:55:13+5:302018-11-10T15:55:28+5:30

पेगलवाडी : सिद्धार्थ धारणे यांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन

Environmental awareness from picture display | चित्र प्रदर्शनातून पर्यावरण जागृती

चित्र प्रदर्शनातून पर्यावरण जागृती

googlenewsNext
ठळक मुद्दे पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रत्येकाने मनापासुन प्रयत्न करणे ही काळाची गरज बनली असल्याचे लोहगावकर यांनी सांगितले

त्र्यंबकेश्वर : पृथ्वीचे वाढते तापमान हा जगभर चिंतेचा विषय आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी केंद्र व राज्य सरकार मोठ्या प्रमाणावर उपाययोजना करीत आहे. पर्यावरण रक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी आहे . चित्रकला प्रदर्शनाच्या माध्यमातुन हा संदेश सर्वदूर पोहोचेल आणि नागरीकांमध्ये निसर्गाविषयी आवड निर्माण होईल, असे प्रतिपादन त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर यांनी केले.
पेगलवाडी (त्र्यंबक) येथे आयोजित करण्यात आलेल्या सिद्धार्थ धारणे यांच्या पर्यावरण जनजागृती विषयक चित्रकला प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. देशाला सुंदर अशी निसर्ग संपदा लाभलेली आहे. जगभरातील सर्व प्रकारचे हवामान भारतात बघावयास मिळते. स्वत:ला बुध्दीमान समजणाऱ्या मानवाच्या अति हव्यासा पोटी संपुर्ण मानवजातच विनाशाच्या उंबरवठ्यावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे अशा या सुंदर निसर्ग संपदेचे संरक्षण करणे, जतन करणे फार आवश्यक असुन त्यासाठी आपण सर्वांनी सामुहिक प्रयत्न करावेत. या प्रदर्शनातून चित्रकार सिध्दार्थ धारणे यांनी पर्यावरण विषयक संदेश दिला आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रत्येकाने मनापासुन प्रयत्न करणे ही काळाची गरज बनली असल्याचेही लोहगावकर यांनी सांगितले. यावेळी स्वामी विजय महाराज मुमुक्षु, पोलीस उपनिरिक्षक कैलास आकुले , शिवसेनेचे तालुका संपर्क प्रमुख भुषण अडसरे, शहर प्रमुख सचिन दीक्षित, छोटु पवार, भावेश शिखरे, हर्षल शिखरे, संकेत टोके, शेखर सावंत, संघाचे राजेंद्र ढेरगे, वैभव देशपांडे, आदि नागरीक उपस्थित होते.
पन्नासहून अधिक चित्रे
भारतामधील विविध प्रांतातील निसर्ग निर्मित तब्बल चाळीस सौंदर्यस्थळे तसेच इतर अप्रतिम कॅनव्हास पेंटीग्ज अशा ५० पेक्षा अधिक पेटींग्ज प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत. या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी स्वामी सागरानंद सरस्वती महाराज, माजी नगराध्यक्ष तथा त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त संतोष कदम, युनिकॉल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक हेमल चुघ, पेगलवाडीचे ग्रामपंचायत सदस्य सदस्य पांडुरंग आचारी, आर्ट गॅलरीचे संचालक रविंद्र धारणे, ज्योती धारणे यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आले.

Web Title: Environmental awareness from picture display

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.