घरगुती गणरायांचे पर्यावरणस्नेही विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 12:57 AM2017-09-07T00:57:27+5:302017-09-07T01:01:28+5:30
नाशिक : पीओपी मूर्ती, मूर्तीवरील रासायनिक रंग, निर्माल्य, गणेशोत्सव सजावट साहित्यातील थर्माकोल, प्लॅस्टिकची फुले यामुळे पर्यावरणाला पोहोचणारी हानी, प्रदूषित होणारे पाणी, जलचर प्राण्यांवर होणारा परिणाम या साºयांची जाणीव ठेवत यंदा नाशिककरांनी आपल्या घरगुती गणरायाचे पर्यावरणस्नेही विसर्जन करण्यावर भर दिल्याचे दिसून आले.
नाशिक : पीओपी मूर्ती, मूर्तीवरील रासायनिक रंग, निर्माल्य, गणेशोत्सव सजावट साहित्यातील थर्माकोल, प्लॅस्टिकची फुले यामुळे पर्यावरणाला पोहोचणारी हानी, प्रदूषित होणारे पाणी, जलचर प्राण्यांवर होणारा परिणाम या साºयांची जाणीव ठेवत यंदा नाशिककरांनी आपल्या घरगुती गणरायाचे पर्यावरणस्नेही विसर्जन करण्यावर भर दिल्याचे दिसून आले. शाडूमाती गणेशमूर्तींचे टपात विसर्जन, पीओपीच्या मूर्तींसाठी अमोनियम बायो कार्बोनेट पावडरचा वापर, मूर्ती संकलन केंद्रावर गणेशमूर्ती दान करीत नाशिककरांनी जबाबदार नागरिक असल्याचे आपल्या कृतीतून अधोरेखित केले आहे. मूर्तींबरोबरच निर्माल्यही नदी, तलावात न टाकता ते निर्माल्य कलशात, संकलन केंद्रात जमा करण्यावर त्यांनी भर दिला. यंदा जागरूक नाशिककरांकडून १ लाख ६९ हजार मूर्ती दान करण्यात आल्या. याचबरोबर बहुतांशी लोकांनी आपल्या घरातील गणेशाची मूर्ती अंगणात टपात, घंगाळ्यात बुडवून ती विरघळल्यानंतर ते पाणी झाडांना टाकत पर्यावरण रक्षणाला हातभार लावला. काही गणेशभक्तांनी विसर्जनस्थळी तयार केलेला कृत्रिम तलाव, टॅँकमध्येही गणरायाच्या मूर्तींचे विसर्जन केले.
घरच्या गणेशाचे असे पर्यावरणपूरक विसर्जन करून नंतर मिरवणूक पहाण्यासाठी कुटुंबीयांसह शहरात आपला मोर्चा वळवला. सोमेश्वर, पंचवटी, नाशिकरोड आदी ठिकाणी मूर्ती व निर्माल्य दान करणाºया गणेशभक्तांना प्रोत्साहन देण्याचे कामही त्यांनी आवर्जून केले. बºयाच नागरिकांनी गणेशोत्सव काळात जमा झालेले निर्माल्य खत पेटीत टाकण्यावर भर दिल्याचेही दिसून आले. अशाप्रकारे गणेशोत्सव काळात पर्यावरणाचा प्राधान्याने विचार करणाºया नागरिकांशी संवाद साधला असता पुढील काळातही हे धोरण कायम ठेवत पुढील पिढीलाही हा वसा देणार असल्याने त्यांनी स्पष्ट केले. ही जागरूकता अधिकाधिक नागरिकांमध्ये वाढायला हवी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.