मानवकेंद्रित विकासामुळे पर्यावरणाचा ºहास : शाईवाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 12:45 AM2018-05-20T00:45:54+5:302018-05-20T00:45:54+5:30

पृथ्वीवरील मानव हा सर्वांत बुद्धिमान असला तरी आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून पर्यावरणाकडून जसा पाहिजे तसा आपला विकास साधून घेत मानवकें द्रित विकास केल्यामुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ºहास होत असून, मानवाला त्याची मोठी किंमत मोजावी लागणार असल्याचा इशारा डोंबिवली येथील पर्यावरण कार्यकर्त्या रूपाली शाईवाले यांनी दिला आहे.

 Environmental Impact of Man-centric Development: Inshore | मानवकेंद्रित विकासामुळे पर्यावरणाचा ºहास : शाईवाले

मानवकेंद्रित विकासामुळे पर्यावरणाचा ºहास : शाईवाले

googlenewsNext

नाशिक : पृथ्वीवरील मानव हा सर्वांत बुद्धिमान असला तरी आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून पर्यावरणाकडून जसा पाहिजे तसा आपला विकास साधून घेत मानवकें द्रित विकास केल्यामुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ºहास होत असून, मानवाला त्याची मोठी किंमत मोजावी लागणार असल्याचा इशारा डोंबिवली येथील पर्यावरण कार्यकर्त्या रूपाली शाईवाले यांनी दिला आहे.  गोदाघाटावरील नाशिक वसंत व्याख्यानमालेत शनिवारी (दि.१९) रूपाली शाईवाले यांनी एकोणाविसावे पुष्प गुंफले. डॉ. दौलतराव अहेर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘पर्यावरण’ विषयावर बोलताना शाईवाले यांनी उपस्थिताना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून सांगतानाच मानवकेंद्री विकासाच्या मागे धावताना मनुष्य कशाप्रकारे पर्यावरणावर घाला घालतो आहे याचे चित्र उभे केले. त्या म्हणाल्या भारतातील सण हे ऋ तूबदलावर आधारित असून, त्यानुसार आहारातही बदल होतो. निसर्गातील बदलानुसार माणसाने आपल्या जीवनशैलितही बदल करायला हवा. सध्या मात्र याच गोष्टीचा सर्वांना विसर पडत असून, मानव आता आपल्या जीवनशैलीनुसार निसर्गात बदल घडविण्याचे प्रयत्न करीत अहे. सण-उत्सवांमागे तर केवळ खरेदी करणे मौज करणे हा एकच विचार उरला आहे. त्यामुळे अनेकदा पर्यावरणाचा ºहास करणाऱ्या वस्तुंचा प्लॅस्टिक थर्माकोलसरखा वापर वाढतो. बºयाचदा देखाव्यांच्या सजावटीसाठी थर्माकोलला पर्याय म्हणून कागदाचा वापर केला जातो. मात्र, कागदही लाकडापासून तयार होत असल्याने त्यासाठी होत असलेल्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा ºहास होत असल्याचे त्यांनी सांगितले.
आजचे व्याख्यान,  विषय : जीवन : एक आनंदयात्रा,  वक्ते : अंजली तापडिया

Web Title:  Environmental Impact of Man-centric Development: Inshore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक