पर्यावरणाचा संदेश देण्याचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 12:14 AM2019-03-28T00:14:39+5:302019-03-28T00:14:57+5:30

सामाजिक क्षेत्रात तरुणांच्या रोजगाराबरोबरच पर्यावरणाचाही समतोल राखण्यासाठी विविध उपक्रम राबविणाऱ्या जेसीआय अंबडने यंदा होळीच्या सणाला नागरिकांना पर्यावरण रक्षणाचा सल्ला देत रोपांचे वाटप केले.

 Environmental Promotional Activities | पर्यावरणाचा संदेश देण्याचा उपक्रम

पर्यावरणाचा संदेश देण्याचा उपक्रम

Next

नाशिक : सामाजिक क्षेत्रात तरुणांच्या रोजगाराबरोबरच पर्यावरणाचाही समतोल राखण्यासाठी विविध उपक्रम राबविणाऱ्या जेसीआय अंबडने यंदा होळीच्या सणाला नागरिकांना पर्यावरण रक्षणाचा सल्ला देत रोपांचे वाटप केले.
इंदिरानगर येथील जॉगिंग ट्रॅक येथे पहाटेच्या सुमारास रोपे वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. गेल्या २८ वर्षांपासून अशा प्रकारचा उपक्रम राबविला जात आहे. होळीच्या मुहूर्तावर इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक येथे रोपांच्या वाटपाचे काम जेसीआय अंबडच्या सभासदांनी केले.
प्रकल्प संयोजक अजिंक्य काटे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. अध्यक्ष प्रतीक कुलकर्णी यांनी प्रकल्पाचे प्रास्ताविक केले. याप्रसंगी माजी अध्यक्ष डॉ. धनंजय अहिरे, प्रमोद वाघ, चेतन पाटील, विशाल तांदळे, चैतन्य भुजंग, वृषाली खाकुर्डीकर, अश्विन सोनावणे, अमित कोतकर, नागेश पिंगळे, रमण साळी, प्रणव महाजन, अद्वैत निफाडकर, अंकुश जाजू, प्रवीण वालझाडे, निनाद जाधव आदी सभासद उपस्थित होते. आभार सचिव विवेक पाटील यांनी मानले.

Web Title:  Environmental Promotional Activities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक