पर्यावरणपूरक आकाशकंदिलांची क्रेझ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 10:25 PM2019-10-13T22:25:22+5:302019-10-14T00:27:20+5:30
दीपावलीच्या पार्श्वभूमीवर नेत्रदीपक आकाशकंदील खरेदीसाठी बालगोपाळांसह आबालवृद्धांची शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये गर्दी करत असल्याचे दिसत आहे. यंदा मान्सूनही चांगला झाला असल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विक्र ेत्यांकडून विविध आकाशकंदील विक्रीसाठी ठेवले आहे.
नाशिक : दीपावलीच्या पार्श्वभूमीवर नेत्रदीपक आकाशकंदील खरेदीसाठी बालगोपाळांसह आबालवृद्धांची शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये गर्दी करत असल्याचे दिसत आहे. यंदा मान्सूनही चांगला झाला असल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विक्र ेत्यांकडून विविध आकाशकंदील विक्रीसाठी ठेवले आहे. बाजारपेठेत फेरफटका मारल्यास चिनी मालाचे प्रमाण भारतीय वस्तुंनी मोडून काढल्याचे दिसत आहे.
दिवाळीचे मुख्य आकर्षण असणारे आकाशकंदिलाचे अनेक प्रकार बाजारात दाखल झाले आहेत. यंदा चिनी आकाशकंदील बाजारात कमी प्रमाणात दिसत असून, पर्यावरणस्नेही विशेषत: ‘हॅण्डमेड पेपर’ तसेच कापडी आकाशकंदीलला विशेष मागणी आहे. त्यात घुमट, चौकोनी, गोलाकार, दिवा, चांदणी, पेशवाई, टमटा बॉल, पॅराशुट आकाशकंदील यंदा बाजारात मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. सणांचा राजा असलेल्या दिवाळीच्या तयारासाठी साऱ्यांची लगबग सुरू झाली असून विविध वस्तू खरेदीसाठी बाजारात ग्राहकांची गर्दी होऊ लागली आहे. यानिमित्ताने बाजारात चैतन्य निर्माण झाले आहे. प्रकाशाचा उत्सव असलेल्या या सणानिमित्त आकाशकंदील, पणत्यांची दुकाने जागोजागी थाटली आहे. आकर्षक आकाशकंदील ग्राहकांचे लक्ष वेधून घेत असून, यावर्षी आकाशकंदिलांचे पारंपरिक आणि काही नवे प्रकारही बाजारात दाखल झाले आहेत. यंदा चायना बनावटीपेक्षा देशी बनावटीच्या आकाशदिव्यांना जास्त पसंती मिळत असल्याचे विक्रे त्यांनी सांगितले. त्यामुळे भारतीय बनावटीच्या आकाशकंदिलांना चांगली मागणी असून, १५ ते ५ हजारांपर्यंत कंदिलांचे दर आहेत.
भारतीय आकाशकंदिलांची आजही उपेक्षा
काही वर्षांपासून देशात चायनीज वस्तूंनी भारतीय बाजारपेठेत त्यांचे अस्तित्व निर्माण केले मात्र यामुळे देशातील पारंपरिक आकाशकंदिल बनविणाऱ्यांची संख्येत घट होत गेली. भारतीय बनावटीच्या कंदिलांपेक्षा चायनीज कंदिले, लाइटमाळी स्वस्त मिळत असल्याने परिणामी याचा फटका भारतीय कंदिलांना बसला मात्र पुन्हा पारंपरिक कंदिलांच्या उत्पादनाच्या निर्मितीत वाढ होत असून, यामुळे येणाºया काळात नक्कीच चायनीज वस्तूंना मागे टाकतील, असे मत व्यापारीवर्गातून येत आहे.