समान काम समान वेतनासाठी शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 01:37 PM2019-01-22T13:37:45+5:302019-01-22T13:46:28+5:30

महाराष्ट्र राज्य शासकीय व निमशासकीय विभागात कार्यरत गट ‘क ’ तथा लिपिक संवर्गातील नाशिक जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी ग्रेड वेतनात सुधारणा करून समान कामास समान वेतन व समान पदोन्नतीचे टप्पे करणे व मंत्रालय ते ग्रामपंचायत लिपिकांचे एकसारखे पदनाम करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी (दि.२२) शहरातून मोर्चा काढून जिल्हाध्याधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.

Equal work of government, semi government employees' agitation for equal pay | समान काम समान वेतनासाठी शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांचे आंदोलन

समान काम समान वेतनासाठी शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांचे आंदोलन

Next
ठळक मुद्देलिपिक संवर्गीय कर्मचाऱ्यांचे नाशिकमध्ये आंदोलन गोल्फक्लबपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा समान काम, समान वेतनासह जून्या पेन्शन योजनेची मागणी

नाशिक: महाराष्ट्र राज्य शासकीय व निमशासकीय विभागात कार्यरत गट ‘क ’ तथा लिपिक संवर्गातील नाशिक जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी ग्रेड वेतनात सुधारणा करून समान कामास समान वेतन व समान पदोन्नतीचे टप्पे करणे व मंत्रालय ते ग्रामपंचायत लिपिकांचे एकसारखे पदनाम करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी (दि.२२) शहरातून मोर्चा काढून जिल्हाध्याधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. 
नशिक जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांनी मंगळवारी गोल्फ क्लब मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चाकाढून जिल्हाधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन दिले.  यात लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांनी ग्रेड वेतनात सुधारणा करून समान कामास समान वेतन व समान पदोन्नतीचे टप्पे करणे व मंत्रालय ते ग्रामपंचायत लिपिकांचे एकसारखे पदनाम करण्याच्या मागणीसह डीसीपीएस /एनपीएस योजना बंद करून मूळची १९८२ ची जूनी सेवानिवृत्ती योजना लागू करण्याची व सातव्या वेतन आयोगाचा वर्षाचा फरक रोखीने देण्यात यावा अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. त्यासोबतच बक्षी समितीच्याशिफारशिंनुसार  केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे, लिपिकांना अश्वासित प्रगती योजनेचा लाभ १०, २०, व ३० अशा टप्प्यात देण्यात यावा, सुधारीत आकृतीबंध  लागू करताना लिपिक संवर्गाची पदे बाह्य यंत्रणेमार्फत अथवा कंत्राटी पद्धतीने निर्मिती न करता ती  स्थायी स्वरुपाची करण्यात यावी, लिपिकांच्या अर्जित रजा साठविण्याची किमान मर्यादा काढून टाकण्यात यावी, तसेच कॅशलेस वैद्यकीय सुविधा व नियमित प्रशिक्षण देण्यात यावे या मागण्यांचाही कर्मचाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात  समावेश आहे. दरम्यान,  जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ््यास अभिवादन करून मोर्चाता समारोप केला. यावेळी कर्मचाऱ्यांनी  हा शासनासाठी इशारा असून कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर तीव्र स्वरुपाचे राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशाराही महाराष्ट्र राज्य शासकीय व निमशासकीय लिपिक संवर्गीय हक्क परिषदेने दिला आहे. यावेळी परिषदेचे जिल्हाध्यक्ष निलेश देशमुख, समन्वयक विनायक केदारे, कार्याध्यक्ष विश्वास कचरे, रमेश जेजूरकर,  निलेश पाटील, हिरामण झोटींग, आनंद कांगणे, रंजना मांडे, निता पाटील आदी उपस्थित होते. 

Web Title: Equal work of government, semi government employees' agitation for equal pay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.