समीकरणे बदलणार : श्रमजीवी संघटना उतरणार रणांगणात त्र्यंबकला वाढला निवडणुकीचा फीव्हर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 11:35 PM2017-11-12T23:35:43+5:302017-11-13T00:12:54+5:30

पालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांनी चांगलीच कंबर कसली असून, शहरात निवडणुकीचा फीव्हर चांगलाच वाढू लागला आहे.

The equation will change: Trimakkal gets active in the battlefield | समीकरणे बदलणार : श्रमजीवी संघटना उतरणार रणांगणात त्र्यंबकला वाढला निवडणुकीचा फीव्हर

समीकरणे बदलणार : श्रमजीवी संघटना उतरणार रणांगणात त्र्यंबकला वाढला निवडणुकीचा फीव्हर

Next
ठळक मुद्देनगराध्यक्षपदाची निवडणूक थेट जनतेमधून१७ प्रतिनिधी निवडून द्यायचे आहेत बहुतेक इच्छुकांनी भाजपाकडे उमेदवारी

त्र्यंबकेश्वर : पालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांनी चांगलीच कंबर कसली असून, शहरात निवडणुकीचा फीव्हर चांगलाच वाढू लागला आहे. सध्या पालिकेवर भाजपाचे वर्चस्व असून, आगामी काळात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. श्रमजीवी संघटना पहिल्यांदाच रणांगणात उतरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
त्र्यंबक निवडणुकीसाठी आचारसंहिता तीन दिवसांपूर्वीच लागली आहे. पुढील महिन्यात १० डिसेंबरला मतदान होत आहे. विशेष म्हणजे यावेळच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदाची निवडणूक थेट जनतेमधून केली जाणार आहे. याचवेळी प्रभागांचे आरक्षण चक्रांकित पद्धतीने करण्यात आले आहे. त्यामुळे आपला मोहल्ला सोडून उमेदवारी करणाºयांची नावे दुसºयाच प्रभागात आरक्षण सोडतपद्धतीने पडली आहेत. त्र्यंबक नगर परिषदेसाठी एकूण १७ प्रतिनिधी निवडून द्यायचे आहेत. या पंचवार्षिकपासून नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून जाणार आहे. नगराध्यक्षांबरोबरच या वर्षापासून ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीचे सरपंचपददेखील जनतेतूनच निवडून दिले आहेत. वास्तविक थेट नगराध्यक्षपदाची निवड थेट जनतेतून होण्याची ही तिसरी वेळ आहे. पहिल्यांदा हा मान अण्णासाहेब लोणारी यांना मिळाला होता. त्यानंतर सन २००२ मध्ये थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत महिला नगराध्यक्ष पुष्पा मोहन झोले यांना संधी मिळाली होती. आता यावेळेस तिसºयांदा थेट जनतेतून नगराध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. त्यामुळे या पदासाठी चुरस वाढणार आहे. त्यासाठी तुल्यबळ उमेदवारांची नावे निश्चित झाली आहेत. या पदासाठी बहुतेक इच्छुकांनी भाजपाकडे उमेदवारी मागितली आहे. सुनील अडसरे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत मागील महिन्यात काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यात कैलास घुले, सुनील अडसरे, पुरुषोत्तम लोहगावकर, अ‍ॅड. पराग दीक्षित व सुचेता शिखरे या प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे. पुरुषोत्तम लोहगावकर व अ‍ॅड. पराग दीक्षित वगळता कैलास घुले, सुनील अडसरे व सुचिता शिखरे यांनी यापूर्वी नगराध्यक्षपद भूषविलेले आहे. याशिवाय शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचेदेखील उमेदवार इतर उमेदवारांसमोर आव्हान उभे करू शकतात. त्यामुळे पालिका निवडणुकीत कोणाच्या हाती निरंकुश पाच वर्षे सूत्रे राहणार हा औत्सुक्याचा विषय ठरणार आहे. उमेदवारी मिळविण्यासाठी अनेकांची धावपळ, मुंबई वाºया, तर कोणी जसे जमेल तसे वरून दबावतंत्राचा वापर करून पक्षाकडून उमेदवारी मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

Web Title: The equation will change: Trimakkal gets active in the battlefield

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.