बोपेगावला उभारणार सुसज्ज कोविड सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:14 AM2021-05-15T04:14:03+5:302021-05-15T04:14:03+5:30
कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील पाटील यांच्या उपस्थितीत नुकतीच बैठक होत बोपेगाव येथे ऑक्सिजन बेड सुविधायुक्त अत्याधुनिक ...
कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील पाटील यांच्या उपस्थितीत नुकतीच बैठक होत बोपेगाव येथे ऑक्सिजन बेड सुविधायुक्त अत्याधुनिक कोविड सेंटर उभारण्याबाबत चर्चा झाली होती. त्या प्रस्तावित सेंटरची आमदार नरहरी झिरवाळ, माजी आमदार धनराज महाले यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पाहणी करत आढावा घेतला.
वणी व दिंडोरीत १२० ऑक्सिजन बेडची सुविधा सुरू झाली असून, अजून २० ते ३० ऑक्सिजन बेड सुरू करण्याचे ठरविण्यात आले. शासनाला तातडीने प्रस्ताव पाठविण्यात येऊन त्यास मंजुरी घेत तातडीने काम हाती घेण्यात येणार असून, परिसरातील ग्रामपंचायत नागरिक या केंद्रास हातभार लावणार आहेत. सध्याचे कोविड केअर सेंटरमध्ये स्वच्छता ठेवण्याबाबत तसेच जेवण, नास्ता चांगला द्यावा अशा सूचना झिरवाळ यांनी केल्या. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य भास्कर भगरे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख पांडुरंग गणोरे, बोपेगावचे सरपंच वसंत कावळे, जवळके वणीचे सरपंच योगेश दवंगे यांनीही विविध सूचना करत ऑक्सिजन बेड केंद्रासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
===Photopath===
140521\img-20210514-wa0064.jpg
===Caption===
बोपेगाव कोव्हिडं सेंटर ला भेट देऊन पाहणी करताना विधानसभा प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ, माजी आमदार धनराज महाले,शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील पाटील,जिप सदस्य भास्कर भगरे आदी मान्यवर