समतोल पत्रकारिता आवश्यक : ई. वायुनंदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 12:54 AM2018-04-28T00:54:17+5:302018-04-28T00:54:17+5:30

पत्रकारिता हे संवाद माध्यमाचे सर्वोत्कृष्ट साधन असून, पत्रकारांनी सत्य, अचूक , समतोल आणि शैलीची सभ्यता जपून पत्रकारिता करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी केले.

 Equivalent Journalism Required: E. Airbanking | समतोल पत्रकारिता आवश्यक : ई. वायुनंदन

समतोल पत्रकारिता आवश्यक : ई. वायुनंदन

Next

नाशिक : पत्रकारिता हे संवाद माध्यमाचे सर्वोत्कृष्ट साधन असून, पत्रकारांनी सत्य, अचूक , समतोल आणि शैलीची सभ्यता जपून पत्रकारिता करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी केले.  यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, एच.पी.टी. आटर््स, आर.वाय.के. सायन्स कॉलेज अभ्यासकेंद्र जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या शिक्षणक्रम आयोजित ‘वृत्तगंगा’ व ‘ज्ञानगंगोत्री’ या अनियतकालिकांचे प्रकाशन व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.  या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, जेएमसीटी कॉलेजचे रौफ पटेल, प्रा. धनंजय माने, प्रा. हमीद शेख, ज्येष्ठ पत्रकार सुधीर कावळे आदी उपस्थित होते. ई. वायुनंदन यांनी सांगितले की, शिक्षणक्रमात पदव्युत्तर पदवी व पदवीची पुनर्रचनाही करण्यात येणार असल्याचे तसेच वडाळारोडवरील जेएमसीटी महाविद्यालयातही मुक्त विद्यापीठाचे अभ्यासकेंद्र लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. प्रास्ताविक केंद्र संयोजक प्रा. श्रीकांत सोनवणे यांनी केले.
मार्गदर्शक व विजेत्यांचा सत्कार
अभ्यासकेंद्राच्या मार्गदर्शक प्रा. डॉ. गीता यादव, दीपाली घाटोळ, सुवर्णपदक विजेत्या वैजयंती इगवे, देवयानी कुलथे, जयेश परमार, आझाद आव्हाड, किरण घुडगे, गणेश मेहरखान, पोपटराव देवरे, अनिल जाधव यांचा सत्कार करण्यात आला.

Web Title:  Equivalent Journalism Required: E. Airbanking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.