जगभरात भाषांसाठी युगांताचा काळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 01:03 AM2017-09-25T01:03:40+5:302017-09-25T01:03:45+5:30

जगभरातील विविध देशांमध्ये सध्या भाषांसाठी युगांताचा काळ असल्याने भाषा मरत चालल्या असताना सांस्कृतिक आणि सामाजिक वारसा मरणासन्नतेच्या दिशेने जात असून त्यामुळे लोकशाहीला बट्टा लागण्याची स्थिती जगभरातील विविध देशांमध्ये निर्माण झाल्याची खंत ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय भाषा तज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांनी व्यक्त केली.

The era of time for languages ​​worldwide | जगभरात भाषांसाठी युगांताचा काळ

जगभरात भाषांसाठी युगांताचा काळ

Next

नाशिक : जगभरातील विविध देशांमध्ये सध्या भाषांसाठी युगांताचा काळ असल्याने भाषा मरत चालल्या असताना सांस्कृतिक आणि सामाजिक वारसा मरणासन्नतेच्या दिशेने जात असून त्यामुळे लोकशाहीला बट्टा लागण्याची स्थिती जगभरातील विविध देशांमध्ये निर्माण झाल्याची खंत ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय भाषा तज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांनी व्यक्त केली.  परशुराम साईखेडकर नाट्यगृहात सावानातर्फे सुवर्णमहोत्सवी साहित्यिक मेळाव्यात ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत महामिने यांना डॉ. गणेश देवी यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी साहित्यिक मेळाव्याचे अध्यक्ष दत्ता पाटील कविसंमेलनाचे अध्यक्ष रेखा भांडारे यांच्यासह प्रा. विलास औरंगाबादकर, आमदार सीमा हिरे, महापालिका विरोधी पक्ष गटनेता अजय बोरस्ते आदी उपस्थित होते.  सावानातर्फे या वर्षापासून जीवन गौरव पुरस्कारांची सुरुवात करण्यात आली असून, महामिने या पुरस्काराचे प्रथम मानकरी ठरले आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यास संबोधित करताना डॉ. गणेश देवी यांनी जगभरातील भाषांसाठी हा युगांताचा काळ असल्याचे सांगितले. या काळात विविध भाषांशी संबंधित सामाजिक आणि सांस्कृतिक परंपराही मरत चालल्या आहेत. या भाषा वाचविण्यासाठी २०१८ मध्ये भारतात आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलन होणार असून, या संमेलनात सहभागी होणाºया १३२ देशांमध्ये लोकशाहीच्या संकल्पना झपाट्याने बदलत चालल्या आहेत. त्यामुळे बदलत्या काळानुसार बदलने गरजेचे आहे असे ते म्हणाले.

Web Title: The era of time for languages ​​worldwide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.