पाऊसधारांनी भिजला अखेर एरंडगाव शिवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 04:33 PM2020-07-27T16:33:32+5:302020-07-27T16:34:13+5:30

एरंडगाव : पावसाने दिलेल्या ओढीनंतर परिसरातील शिवार पाऊसधारांनी भिजला आहे. डुलतात पिके रान सारे हिरवेगार.. कवितेच्या या ओळिंसारखे दृष्य परिसरात अनुभवायला येत आहे.

Erandgaon Shivar finally got wet due to rains | पाऊसधारांनी भिजला अखेर एरंडगाव शिवार

पाऊसधारांनी भिजला अखेर एरंडगाव शिवार

Next
ठळक मुद्दे विहिरींच्या पाण्याचा स्रोत वाढला.

लोकमत न्यूज नेटवर्क
एरंडगाव : पावसाने दिलेल्या ओढीनंतर परिसरातील शिवार पाऊसधारांनी भिजला आहे. डुलतात पिके रान सारे हिरवेगार.. कवितेच्या या ओळिंसारखे दृष्य परिसरात अनुभवायला येत आहे.
मृगनक्षत्राच्या शुभ मुहूर्तावरच परिसरात पावसाने हजेरी लावल्याने शेतीची कामे वेळेवर सुरु झाली. नदी नाल्यांना छोटे मोठे बंधारे असल्यामूळे वाहणारे पाणी अडविले गेले, त्यामूळे विहिरींच्या पाण्याचा स्रोत वाढला. वेळेवर पिण्याच्या व पिकांच्या पाण्याची सोय झाली. शेतकऱ्यांनी आपापल्या शेतात खरिपातील बाजरी, सोयाबीन, मका, मूग, भुईमूग, कपाशी, भाजीपाला आदी पिकांच्या पेरण्या व लागवडी केल्या.
सद्या सारा शिवार हिरवाईने नटला आहे. पिके आभाळाच्या दिशेने डुलत आहे. निंदणी, खुरपणी, औषध फवारणीच्या कामाला वेग आला आहे. सुगीचा हंगाम असल्यामुळे लहान-मोठ्यांसह प्रत्येकाच्या हाताला काम मिळाले आहे.

Web Title: Erandgaon Shivar finally got wet due to rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.