एस.टी. कर्मचा-यांच्या पत्नी आता रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 12:57 AM2017-07-29T00:57:50+5:302017-07-29T00:58:49+5:30
लांब पल्ल्याच्या तसेच डबल ड्युट्या करूनही अत्यल्प पगारामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणे कठीण होते.
नाशिक : लांब पल्ल्याच्या तसेच डबल ड्युट्या करूनही अत्यल्प पगारामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणे कठीण होते. त्यामुळे मानसिक दबावात असलेल्या आणि तरीही दिवसरात्र राबणाºया आपल्या पतिराजांना साथ देण्यासाठी एस. टी. कर्मचाºयांच्या पत्नी आता रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत. ‘आपल्या धन्यासाठी व उरल्यासुरल्या संसारासाठी’ अशी भावनिक साद सोशल मीडियावर घालत एस. टी. कर्मचाºयांच्या पत्नी एकजूट होण्याचे आवाहन करीत आहेत.
एस. टी. कर्मचाºयांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतनश्रेणी मिळावी यासाठी एस. टी. कामगार संघटना आणि इंटक यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे, तर उर्वरित १३ संघटनांनी कामगारांचा नियमित वेतन करार करावा, अशी मागणी केली आहे. एस.टी. प्रशासनानेदेखील कराराची तयारी दर्शवित मान्यताप्राप्त कामगार संघटना करारास विलंब करीत असल्याचे म्हटल्याने प्रशासनाविरोधात संघटनेमध्ये तीव्र नाराजी आहे. वेतन आयोगाच्या बाजूने कर्मचारी असल्याचा दावा करीत संघटनेने आयोगाची मागणी लावून धरत प्रसंगी संपाचीदेखील हाक दिली आहे.
एस.टी. कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा यासाठीची लढाई तीव्र होत असतानाच यात आता एस. टी. कामगारांच्या पत्नींनीदेखील उडी घेतली आहे.