अखेर सिन्नर मध्ये इएसआयसी रुग्णालय कार्यान्वित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:22 AM2021-02-23T04:22:35+5:302021-02-23T04:22:35+5:30
सिन्नर तालुक्यातील औद्योगिक कामगारांच्या वेतनातून ईएसआयसीचा निधी नियमित कपात केला जात होता. सिन्नरला ईएसआयसीची वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याने या ...
सिन्नर तालुक्यातील औद्योगिक कामगारांच्या वेतनातून ईएसआयसीचा निधी नियमित कपात केला जात होता. सिन्नरला ईएसआयसीची वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याने या कामगारांना लाभ मिळत नव्हता. म्हणून औद्योगिक संघटनांनी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. अखेर सिन्नर तालुक्यासाठी स्वतंत्र ईएसआयसीचे औषधालय आणि शाखा कार्यालयास मंजुरी मिळाली. ईएसआयसी राज्याचे अप्पर आयुक्त प्रणय सिन्हा यांच्या प्रमुख उपस्थिती सिन्नर कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी औषधालय शाखा कार्यालयाचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत अहिरे, उपक्षेत्रीय कार्यालयाचे प्रभारी उपनिदेशक निश्चल कुमार नाग, सहायक निदेशक जे.बी. खैरनार आदी उपस्थित होते. (फोटो २२ सातपूर)
चौकट -
सिन्नर तालुक्यातील २५ हजार कामगार आणि त्यांचे कुटुंबीय असे एक लाख लाभार्थींना या रुग्णालयाचा लाभ मिळणार आहे. प्राथमिक आरोग्य सुविधा आणि शाखा कार्यालयातून देण्यात येणारे रोखीचे हितलाभ या दोन्ही गोष्टी एकाच कार्यालयातून उपलब्ध करून देणारे हे जिल्ह्यातील पहिले कार्यालय ठरले आहे.
फोटो :- सिन्नर येथील ईएसआयसी रुग्णालय आणि शाखा कार्यालयाचे उद्घाटन करताना राज्याचे अप्पर आयुक्त प्रणय सिन्हा समवेत डॉ. प्रशांत अहिरे, निश्चल नाग, जितेंद्र खैरनार, कांबळे आदी.