जिल्ह्यात प्राणी क्लेष प्रतिबंधक समिती स्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:12 AM2020-12-23T04:12:25+5:302020-12-23T04:12:25+5:30

नाशिक: निष्पाप प्राण्यांच्या जिवाला निर्माण होणारा धोका टाळण्याबरोबरच त्यांचे संरक्षण करण्यासाठी जिल्हास्तरीय प्राणी क्लेष समिती स्थापन करण्यात आली आहे. ...

Establishment of Animal Cruelty Prevention Committee in the district | जिल्ह्यात प्राणी क्लेष प्रतिबंधक समिती स्थापन

जिल्ह्यात प्राणी क्लेष प्रतिबंधक समिती स्थापन

Next

नाशिक: निष्पाप प्राण्यांच्या जिवाला निर्माण होणारा धोका टाळण्याबरोबरच त्यांचे संरक्षण करण्यासाठी जिल्हास्तरीय प्राणी क्लेष समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून प्राण्यांची वाहतूक, आजारी प्राणी तसेच इजा होणाऱ्या प्राण्यांच्या रक्षणासाठी समिती निर्णय घेणार आहे. यासंदर्भात निवासी उप-जिल्हाधिकाारी भागवत डोईफोडे यांच्या दालनात बैठक पार पडली.

जिल्हास्तरीय प्राणी क्लेष प्रतिबंधक समितीच्या बैठकीत जिल्हा वन अधिकारी आनंद रेड्डी, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. बी. आर. नरवाडे, सहायक आयुक्त डॉ. जी. आर. पाटील, जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी विष्णू गरजे, पशुधन विकास अधिकारी डॉ. उज्ज्वल पवार, डॉ. वैशाली थोरात, महानगरपालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सोनवणे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद साळवी यांच्यासह समितीचे अशासकीय सदस्य अरूण शिंदे, महेंद्र अहिरे, भारती जाधव, आशिष यमगर आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील प्राण्यांच्या संरक्षणासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्हास्तरीय प्राणी क्लेष प्रतिबंधक समिती गठित करण्यात आली असून, या समितीच्या अंतर्गत जिल्ह्यातील प्राण्यासंदर्भातील समस्या, सूचना व तक्रारींच्या अनुषंगाने लवकरच हेल्पलाईन क्रमांक व मोबाईल ॲप्लीकेशन कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे डोईफोडे यांनी सांगितले. जिल्ह्यात दररोज प्राण्यांबाबत काही प्रमाणात घटना घडत असतात, या घटनांमध्ये अनेक वेळा निष्पाप प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. या प्राण्यांच्या संरक्षणासाठी जनजागृती करण्यात येणार आहे. समितीमधील सर्व शासकीय व अशासकीय सदस्यांनी समन्वयाने प्राणी संरक्षणाच्या दृष्टिने कामाचे नियोजन करावे, अशा सूचना डोईफोडे यांनी दिल्या. वाहतुकीत प्राण्यांना होणाऱ्या वेदना, प्राण्यांची चढउतार करण्यासाठी रॅम्प तयार करणे, आजारी, वृद्ध, जखमी, पक्षी, प्राण्यांसाठी निवारा, पाणी, पांजरापोळची सोय करण्यात येणार आहे.

--इन्फेा--

समितीमध्ये सदस्य असे

जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. नरवाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, समितीमध्ये गौरव क्षत्रिय, श्रीमती भारती जाधव, श्रीमती शरण्या शेट्टी, महेंद्र अहिरे, नीलेश इंगळे, आशिष यमगर आणि अरुण शिंदे यांची अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Web Title: Establishment of Animal Cruelty Prevention Committee in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.