त्र्यंबकेश्वरला ’बालस्नेही’ वॉल स्थापन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:10 AM2021-06-19T04:10:49+5:302021-06-19T04:10:49+5:30
राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग बालकांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी देशातील धार्मिक स्थळांची निवड केली आहे. देशातील ५० स्थळांमध्ये नाशिकच्या त्र्यंबकेश्वरचा ...
राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग बालकांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी देशातील धार्मिक स्थळांची निवड केली आहे. देशातील ५० स्थळांमध्ये नाशिकच्या त्र्यंबकेश्वरचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. त्यानुसार बालकामगार, बालकांवरील अत्याचार याबाबत जिल्हास्तरावर मोहीम राबविली जाणार आहे. याठिकाणी वेगवेगळ्या संस्थांच्या मदतीने बालकांना संरक्षित करण्यासाठी कार्यक्रम राबविला जाणार आहे.
जागतिक बालकामगार विरोधी दिनाचे औचित्य साधून कामगार विभाग व जिल्हा महिला बालकल्याण अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने त्र्यंबकेश्वरला जनजागृतीकरिता ‘बालस्नेही’ फलकाचे अनावरण कामगार उपायुक्त वि. ना. माळी यांच्याहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी सहायक कामगार आयुक्त एस. टी. शिर्के, प्रकल्प संचालक जयप्रकाश देशमुख, जिल्हा परिविक्षा अधिकारी राजेंद्र चौधरी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी भारत कानवडे, करिष्मा सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
===Photopath===
180621\18nsk_32_18062021_13.jpg
===Caption===
फोटो कॅप्शन: बालस्नेही फलक अनावरप्रसंगी एस.टी. शिर्के, जयप्रकाश देशमुक, राजेंद्र चौधरी, भारत कानवडे, करिश्मा सुर्यवंशी