कोरोना नियंत्रण कमिटीची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 09:26 PM2020-07-15T21:26:16+5:302020-07-16T00:15:36+5:30
अलंगुण : नाशिक जिल्ह्यात ग्रीन झोन म्हणून समजला जाणाऱ्या सुरगाणा तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर येथील गावकरी व शिक्षणसंस्थेचे कर्मचारी यांची कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संयुक्त नियंत्रण बैठक पार पडली.
अलंगुण : नाशिक जिल्ह्यात ग्रीन झोन म्हणून समजला जाणाऱ्या सुरगाणा तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर येथील गावकरी व शिक्षणसंस्थेचे कर्मचारी यांची कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संयुक्त नियंत्रण बैठक पार पडली.
गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी कोरोना संनियंत्रण गाव कमिटी गठित करण्यात आली. यावेळी विशेष उपाययोजना करण्यात आल्या.
यावेळी माजी आमदार जे. पी. गावित, वसंत बागुल, पांडुरंग भोये, गोपाळ चौधरी, आनंदा गावित, कृष्णा गायकवाड, यादव गवळी, वसंत गायकवाड, गुलाब कामडी, यशवंत मुडा, सखाराम पवार, शिवराम भोये, काशिराम जाधव, यशवंत गावित, रमेश गोविंदा गावित, आर.डी. भोये, डी.एन. सांगळे, डी.जी. ठाकरे उपस्थित होते.
-------------------
..या आहेत उपाययोजना
गावाबाहेरील कर्मचाऱ्यांनी स्थानिक राहावे. गावातील नागरिकांनी गावाबाहेर जाणे शक्यतो टाळावे. भाजीवाला, फेरीवाला किंवा किराणावाला आदींसह इतर सर्वांना कोरोना नियंत्रण कमिटीची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय गावात प्रवेश नाकारण्यात आला. फेरीवाला आला तर गावभर फिरून देता एक निश्चित जागा करून देणे. गावातील नागरिकांनी गप्पागोष्टींसाठी घोळका करून न बसणे. बाजारपेठेतील भाज्यांऐवजी रानभाज्यांचा वापर करणे. गावात अनोळखी व्यक्तीस प्रतिबंध करणे. शासनाच्या व प्रशासकीय यंत्रणेच्या सूचनांचे पालन करणे. गावातील नागरिकांनी शेतीविषयक विकास साधणे. शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन आर्थिक विकास करणे आदी विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.