देवपूर विलगीकरण कक्षाची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:15 AM2021-05-06T04:15:19+5:302021-05-06T04:15:19+5:30

युवा नेते राजेश गडाख यांच्या संकल्पनेतून येथील प्राथमिक शाळेत साकारण्यात आलेल्या या कोविड सेंटरमध्ये २५ बेडची सुविधा उपलब्ध आहे. ...

Establishment of Devpur Separation Cell | देवपूर विलगीकरण कक्षाची स्थापना

देवपूर विलगीकरण कक्षाची स्थापना

Next

युवा नेते राजेश गडाख यांच्या संकल्पनेतून येथील प्राथमिक शाळेत साकारण्यात आलेल्या या कोविड सेंटरमध्ये २५ बेडची सुविधा उपलब्ध आहे. ग्रामपंचायतीच्या सहकार्याने व इतर मिळणाऱ्या आर्थिक मदतीतून रुग्णांना रोज चहा, नाश्ता,जेवण व वैद्यकीय सुविधा मोफत मिळणार आहे. अनेकांनी रोख रक्कम व वस्तूंच्या स्वरूपात मदत केली. गडाख यांनी रुग्णांच्या जेवणाची व्यवस्था स्वखर्चातून केली. तर प्रकाश गवळी यांनी रुग्णांना नाश्त्यासाठी मोफत अंडी देण्याचे जाहीर केले. जुगल गवळी यांनी रुग्णांना शुद्ध पाण्याची व्यवस्था केली. आरोग्य विभागात कार्यरत असणारे अंबादास गडाख यांनी कोविड सेंटरसाठी पाच सॅनिटायझर पंप, दोन स्टॅन्ड , दोन हायड्रोक्लोराइड पंप, २५ लीटर सॅनिटायझर, ५० लीटर हायड्रोक्लोराइड अशी महत्त्वाची मुबलक औषधे पुरवली. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विधाते, पवार, अमृतकर तसेच खासगी डॉ. प्रकाश जाधव, डॉ. मोनिका सोनवणे आदींनी रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा दिली.

ग्रामपंचायतच्या सरपंच अनुराधा गडाख, उपसरपंच प्रशांत गडाख, ग्रामपंचायत सदस्य शरद गडाख, भालचंद्र घरटे, राजेंद्र गडाख, वसंत दिवे, सुरेखा गडाख, वनिता गडाख, पुष्पा नरवडे, वनिता गडाख यांनी सेंटर उभारणीसाठी परिश्रम घेतले.

फोटो ओळी- ०५ देवपूर १

देवपूर येथे स्थापन करण्यात आलेला विलगीकरण कक्ष.

===Photopath===

050521\05nsk_26_05052021_13.jpg

===Caption===

 देवपूर येथे स्थापन करण्यात आलेला विलगीकरण कक्ष.

Web Title: Establishment of Devpur Separation Cell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.