यार्डातील बोगीमध्ये गोदावरीच्या बाप्पांची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 05:51 PM2020-08-22T17:51:47+5:302020-08-22T17:55:11+5:30

मनमाड : मनमाड कुर्ला गोदावरी एक्सप्रेसमधील श्री गणरायाना यंदा दहा दिवस दररोज मनमाड ते कुर्ला असा प्रवास घडणार नाही. कोरोनाचे सावट आणि त्यातच रेल्वेसेवा बंद असल्याने मनमाड कुर्ला गोदावरी एक्सप्रेस मधील श्री गणरायाच्या मूर्र्तीची स्थापना मनमाड रेल्वे यार्डातील बोगीत नगराध्यक्ष राजाभाऊ अहिरे यांच्या हस्ते करण्यात आली.

Establishment of Godavari Bappa in the bogie in the yard | यार्डातील बोगीमध्ये गोदावरीच्या बाप्पांची स्थापना

मनमाड येथे गोदावरी एक्सप्रेस गणेश मंडळाच्यावतीने गणरायाची स्थापना करण्यात आली प्रसंगी नगराध्यक्ष राजाभाऊ अहिरे, नरेंद्र खैरे, मुकेश निकळे, संदीप अहिरे आदी. 

googlenewsNext
ठळक मुद्देमनमाड : कोरोनामुळे बाप्पांचे अपडाऊन बंद

मनमाड : मनमाड कुर्ला गोदावरी एक्सप्रेसमधील श्री गणरायाना यंदा दहा दिवस दररोज मनमाड ते कुर्ला असा प्रवास घडणार नाही. कोरोनाचे सावट आणि त्यातच रेल्वेसेवा बंद असल्याने मनमाड कुर्ला गोदावरी एक्सप्रेस मधील श्री गणरायाच्या मूर्र्तीची स्थापना मनमाड रेल्वे यार्डातील बोगीत नगराध्यक्ष राजाभाऊ अहिरे यांच्या हस्ते करण्यात आली. गोदावरी एक्सप्रेस गणेश मंडळ अध्यक्ष नरेंद्र खैरे यांच्यासह पदाधिकारी अतिथी म्हणून उपस्थित होते. कुर्ला गोदावरी एक्सप्रेस मधील गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील एक वैशिष्ट्य पूर्ण उत्सव समजला जातो. गोदावरी एक्सप्रेसच्या बोगीमध्ये आकर्षक सजावट करून श्रीची स्थापना केली जाते आणि प्रवाशाच्या साक्षीने गणरायाना मनमाड ते कुर्ला असा दररोज अडीचशे किलोमीटरचा प्रवास घडतो. या उत्सवामुळे गोदावरी एक्सप्रेसमध्ये गणेशोत्सवच्या काळात दहा दिवस धार्मिक आणि उत्साहाचे वातावरण असते पण यंदा या उत्सवावर कोरोनाचे सावट आहे. गोदावरी एक्सप्रेस गणेश मंडळाचे यंदा २४ वे वर्ष आहे सध्या रेल्वे बंद असल्यामुळे मनमाड रेल्वे स्टेशन यार्डात एक स्वतंत्र बोगी या उत्सवासाठी उपलब्ध करून दिली आहे .या बोगीत आकर्षक सजावट करण्यात आली आहे. यावेळी गोदावरी एक्सप्रेस गणेश मंडळ अध्यक्ष नरेंद्र खैरे , सदस्य मुकेश निकाळे , संदिप व्यवहारे , भूषण पवार , स्वप्निल म्हस्के , मंगेश जगताप , राजू भडके , चेतन मराठे , गोरख खैरे , सुरज चौधरी , शेखर थोरात , धनंजय आव्हाड , ललित धांदल , अमन म्हसदे , अशोक बिहारी, विवेक शेजवळ , विशाल आहिरे , उमेश देसाई , मच्छिन्द्र सांगळे आदी उपस्थित होते.
 

Web Title: Establishment of Godavari Bappa in the bogie in the yard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.