कळवण रोटरी क्लबकडून नवजात शिशुसाठी आयसीयू सेंटर उभारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:11 AM2021-07-10T04:11:21+5:302021-07-10T04:11:21+5:30
कळवण : तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कळवणमध्ये रोटरी क्लबकडून नवजात शिशु आयसीयू सेंटर व आर्थोपेडीक लायब्ररी करण्याच्या मानस प्रांतपाल ...
कळवण : तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कळवणमध्ये रोटरी क्लबकडून नवजात शिशु आयसीयू सेंटर व आर्थोपेडीक लायब्ररी करण्याच्या मानस प्रांतपाल रमेश मेहेर यांनी कळवण रोटरी क्लबच्या नवीन पदाधिकारी पदग्रहण समारंभ प्रसंगी व्यक्त केला.
रोटरी क्लबच्या नूतन अध्यक्षपदाची सूत्रे महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक निलेश भामरे यांनी तर नूतन सचिवपदाची सूत्रे पदवीधर संघटनेचे कळवण शाखेचे सरचिटणीस संभाजी पवार यांनी स्वीकारली. रोटरॅक्ट क्लबच्या नूतन अध्यक्षपदाची सूत्रे कुमारी केतकी पगार व नूतन सचिवपदाची सूत्रे कुणाल देसले यांनी स्वीकारले.
यावेळी कोरोनाकाळात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या डॉ. सुधीर पाटील डॉ. अनंत पवार, डॉ. नूतन सावंत, डॉ.प्रल्हाद चव्हाण यांचा रोटरी क्लब ऑफ कळवणमार्फत नोवेल कोरोना वाॅरिअर्स अवॉर्ड व बुके देऊन डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रमेश मेहेर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
प्रमुख अतिथी म्हणून डॉ. अनंत पवार यांनी कोरोना महामारीची परिस्थिती कथन करून कोरोनाची तिसरी लाट येऊ नये म्हणून लहान मुलांची कशी काळजी घ्यावी याबाबतीत मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रमुख गटविकास अधिकारी डी. ई. जाधव, रमेश मेहेर, संजय आनेराव, रोटे, ओंकार महाले, नरेश मेहता, डॉ. सुधीर पाटील उपस्थित होते.
यावेळी आर. के. एम हायस्कूल, कळवण, जानकाई हायस्कूल कळवण किड्स हायस्कूल भेंडी या शाळेचे इंटरॅक्ट क्लबची घोषणा करण्यात आली यावेळी. विलास शिरोरे यांनी प्रास्ताविक केले, तर राजेश मुसळे यांनी अहवाल वाचन केले.
--------------------------
महिला सबलीकरण, शिक्षण, कोरोनाचे उच्चाटन, पोलिओ निर्मूलन, योग, सायबर सुरक्षा, रस्तासुरक्षा,लसीकरण,व्यसनमुक्ती, आरोग्य,पर्यावरण, शेती या विविध क्षेत्रांत रोटरी क्लब कळवणद्वारे विविध प्रकारे शिबिरांचे आयोजन करण्याचा संकल्प आहे.
- नीलेश भामरे, अध्यक्ष, रोटरी क्लब, कळवण
------------------
कळवण रोटरी क्लबच्या नूतन पदाधिकारी पदग्रहण समारंभप्रसंगी प्रांतपाल रमेश मेहेर. समवेत नीलेश भामरे, संभाजी पवार, केतकी पगार, कुणाल देसले, विलास शिरोरे, जितेंद्र कापडणे, गंगाधर गुंजाळ, निंबा पगार, डॉ. एस. बी. सोनवणे आदी. (०९ कळवण रोटरी)
090721\09nsk_11_09072021_13.jpg
०९ कळवण रोटरी