सर्वधर्म आश्रमात अनेक मूर्तींची प्रतिष्ठापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 12:42 AM2019-08-25T00:42:47+5:302019-08-25T00:43:04+5:30
सदगुरूदेव श्री सतपालजी महाराजप्रणीत मानव उत्थान सेवा समितीच्या वतीने तपोवनातील सर्वधर्म आश्रमाच्या वतीने मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
नाशिक : सदगुरूदेव श्री सतपालजी महाराजप्रणीत मानव उत्थान सेवा समितीच्या वतीने तपोवनातील सर्वधर्म आश्रमाच्या वतीने मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. तपोवन परिसरात कपिला गोदावरी संगमावर अनेक वर्षांपासून समितीचा आश्रम आहे. या आश्रमात विविध देवी देवतांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना गोकुळाष्टमी आणि गोपाळकाल्याचे औचित्य साधून करण्यात आली. या कार्यक्र मात नाशिकसह पुणे, मुंबई, अकोला, मध्य प्रदेश आणि गुजरातहूनही संत महात्मा सहभागी झाले.
सर्वधर्म मंदिरात मंत्रघोषात विविध देवी-देवतांच्या मूर्तींची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्र म सादर झाले. यावेळी गोपाळ काल्यानिमित्त दहीहंडी फोडण्यात आली.
यावेळी चुतरवेदानंद, गोपालानंद, उद्धारानंदजी, साध्वी अंतरमुखी, साध्वी उर्मिला, साध्वी ओमवती, साध्वी मुक्तिका, साध्वी त्रिलोकी, साध्वी सुभद्रा, साध्वी दामिनी, साध्वी शमा आदी उपस्थित होते.
या मूर्तींची प्रतिष्ठापना
श्रीगणेश, लक्ष्मीनारायण,
विठ्ठल-रुक्मिणी, राधा-कृष्ण, भगवान शंकर, भगवान दत्तात्रेय,
माता दुर्गा, जगन्नाथ भगवान, महावीर स्वामी, गौतम बुद्ध, गुरूनानक देवजी यांसह योगीराज हंस महाराज, राजराजेश्वरी देवी यांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली.