नायगावी ग्रामसुरक्षा दलाची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2020 11:47 PM2020-04-05T23:47:05+5:302020-04-05T23:48:16+5:30
नायगाव : कोरोनाच्या संसर्गाचा गावात शिरकाव होऊ न देण्यासाठी ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली. बाहेरील व्यक्तीला गावात प्रवेश बंद करून शंभर टक्के लॉकडाउन नायगावकर यशस्वी करत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नायगाव : कोरोनाच्या संसर्गाचा गावात शिरकाव होऊ न देण्यासाठी ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली. बाहेरील व्यक्तीला गावात प्रवेश बंद करून शंभर टक्के लॉकडाउन नायगावकर यशस्वी करत आहे.
कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी तसेच लॉकडाउन शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून सरपंच नीलेश कातकाडे यांच्या अध्यक्षतेखाली गावातील १५ तरुणांची ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली
आहे.
ग्रामविकास अधिकारी, उपसरपंच अर्चना बुरकुल व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी भारत लॉकडाउन झाल्यापासून ग्रामस्थांचे कोरोना संबंधित जनजागृती करण्यात आली आहे. तसेच घरोघरी जाऊन नागरिकांना घरातच राहण्यासाठी आवाहन करण्यात आले होते.
या समितीचे सदस्य सकाळपासून गावातील मुख्य रस्त्यावर उभे राहून बाहेरील ग्रामस्थांचा गावातील शिरकाव थांबविण्यास मदत करत आहेत. शासनाच्या लॉकडाउनपेक्षाही ग्रामपंचायतीने घालून दिलेल्या लॉकडाउनची नायगाव खोऱ्यातील गावांमध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. जीवघेण्या कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने शेतकऱ्यांनी स्वत:च्या ट्र्ॅक्टरने गावातील गल्लोगल्ली औषधांची फवारणी वारंवार केली जात आहे.
यावेळी सरपंच कातकाडे, सप्तर्षी जेजूरकर, हिरामण जाधव, सखाराम जाधव, दत्तात्रय गवळी, ज्ञानेश्वर जाधव, सागर जेजूरकर आदी ग्रामपंचायतचे कर्मचारी मेहनत घेत आहे.मास्क, साबणांचे वाटपग्रामपंचायतीच्या व हिंदुस्थानात लिव्हर कंपनीच्या वतीने गरीब व गरजू लोकांना त्यांच्या घरी जाऊन मास्क व हात धुण्यासाठी लागणाºया साबणांचे वाटप करण्यात आले. यावेळी कोरोनापासून वाचवण्यासाठी घरातच बसण्याचे व स्वच्छतेचे महत्त्व वाड्या, वस्त्यांवरील नागरिकांना समजावून सांगितले आहे.