नाशिक डिफेन्स इनोव्हेशन हबची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 02:02 AM2019-01-18T02:02:36+5:302019-01-18T02:03:22+5:30

आज उद्योग ज्या स्थितीतून मार्गक्रमण करीत आहे ते पाहता संरक्षण खात्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यासाठीच लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योगांना केंद्र सरकारने केंद्रबिंदू ठेवले आहे. त्याचाच भाग म्हणून यावर्षी सुमारे २८ हजार कोटींच्या आॅर्डर्स देण्यात आल्या आहेत. स्थानिक पातळीवर संरक्षण क्षेत्रातील संशोधन आणि उत्पादनाला चालना देण्यासाठी नाशिक येथे देशातील दुसरे ‘डिफेन्स इनोव्हेशन हब’ स्थापित करण्यात येत असल्याची घोषणा केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी येथे बोलताना केली.

Establishment of Nashik Defense Innovation Hub | नाशिक डिफेन्स इनोव्हेशन हबची स्थापना

नाशिक डिफेन्स इनोव्हेशन हबच्या स्थापनेप्रसंगी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, पालकमंत्री गिरीश महाजन. समवेत खासदार हेमंत गोडसे यांच्यासह अधिकारी.

Next
ठळक मुद्देसंरक्षण राज्यमंत्र्यांकडून घोषणा : सरकार लघु-मध्यम उद्योगांच्या पाठीशी

ओझर : आज उद्योग ज्या स्थितीतून मार्गक्रमण करीत आहे ते पाहता संरक्षण खात्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यासाठीच लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योगांना केंद्र सरकारने केंद्रबिंदू ठेवले आहे. त्याचाच भाग म्हणून यावर्षी सुमारे २८ हजार कोटींच्या आॅर्डर्स देण्यात आल्या आहेत. स्थानिक पातळीवर संरक्षण क्षेत्रातील संशोधन आणि उत्पादनाला चालना देण्यासाठी नाशिक येथे देशातील दुसरे ‘डिफेन्स इनोव्हेशन हब’ स्थापित करण्यात येत असल्याची घोषणा केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी येथे बोलताना केली.
ओझर टाऊनशिप येथे ‘डिफेन्स इंडस्ट्री स्टेकहोल्डर्स सेमिनार’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार हेमंत गोडसे, संरक्षण निर्मिती विभागाचे सचिव डॉ. अजय कुमार, एअर मार्शल व्ही.आर. चौधरी, भारतीय नौसेनेचे व्ही. मोहनदास, डीआरडीओचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. के. मेहता, एचएएलचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक आर. माधवन, भारत फोर्जचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर.एस. भाटिया, संजय जाजू उपस्थित होते. डॉ. भामरे यांनी सांगितले, संरक्षण क्षेत्रातील स्वयंपूर्णतेवर देशाच्या लष्कराची क्षमता अवलंबून आहे. त्यादृष्टीने सामग्रीसाठी स्थानिक पातळीवर संशोधन व उत्पादन होण्यासाठी पहिले डिफेन्स हब कोइम्बतुर येथे असून, दुसरे नाशिक येथे सुरू होत आहे. या क्षेत्रातील सहभागीदारांना याचा लाभ होईल आणि उद्योगांनादेखील प्रोत्साहन मिळेल. धोरणांतर्गत २०१५ पर्यंत संरक्षण क्षेत्रातील उत्पादन करणाऱ्या पहिल्या पाच देशात भारताला आणण्याचे व ३५ हजार कोटी निर्यातीचे उद्दिष्ट आहे. नव्या धोरणानुसार संरक्षण क्षेत्रातील भारतीय खासगी क्षेत्राला चालना मिळण्यासाठी थेट परकीय गुंतवणुक मर्यादा ४९ टक्के करण्यात आल्याचे ते म्हणाले. (पान ३ वर)
पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले, कार्यशाळेच्या माध्यमातून नाशिकच्या उद्योजकांना असणाºया संधीबाबत चांगली चर्चा होऊन त्यातून एक आश्वासक दिशा इथल्या उद्योगक्षेत्राला मिळणार आहे. प्रगत शैक्षणिक संस्थामुळे मिळणारे कुशल मनुष्यबळ, विमानसेवा, मुंबई - आग्रा महामार्ग, रेल्वेमार्ग, धरणांमुळे असणारी पाण्याची उपलब्धता असल्याने नाशिकचा विकास आणि विस्तार वेगाने होत आहे. डिफेन्स इनोव्हेशन हब वेगवान विकासासाठी उपयुक्त ठरणार आहे. देशाच्या संरक्षण सिद्धतेत नाशिकचे यापुढे योगदान राहणार आहे ही आपल्यासाठी अभिमानाची बाब त्यांनी सांगितले. हबमुळे स्थानिक स्तरावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार निर्मितीलादेखील चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त
केला.
यावेळी आमदार अनिल कदम, प्रा. देवयानी फरांदे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब जाधव, उद्योजक धनंजय बेळे, महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, उद्योग समितीचे सचिव आशिष नहार, डॉ. प्रशांत पाटील, प्रदीप पेशकार, राजेंद्र अहिरे, मिलिंद राजपूत, संजय राठी, शशिकांत जाधव, हरिशंकर बॅनर्जी, ललित बूब, किरण वाघ, दिनेश करवा, एचएएल कामगार संघटनेचे अध्यक्ष भानुदास शेळके, सरचिटणीस सचिन ढोमसे यांच्यासह उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विविध विभागाची उत्पादने
संरक्षण सामग्री निर्मिती करणाºया सरकारी उद्योगांमार्फत आयोजित प्रदर्शनाला यावेळी मान्यवरांनी भेट देऊन पाहणी केली. एचएएल, बेल, बीडीएल, एमडीएल, जीएसएल, बीएईएमएल, मिधानीसारख्या संस्थानी आपली उत्पादने प्रदर्शित केली होती. त्याचबरोबर ओएफबी, डीआरडीओ, भारतीय लष्कराचे विविध विभाग, नौसेना आणि वायुसेनेतर्फेदेखील आपल्या उत्पादन आणि सेवेचे प्रदर्शन याठिकाणी करण्यात आले होते.

Web Title: Establishment of Nashik Defense Innovation Hub

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.