प्रस्थापिताना हादरा

By admin | Published: February 4, 2017 12:57 AM2017-02-04T00:57:08+5:302017-02-04T00:57:39+5:30

सायगाव : तिकिटासाठी इच्छुकांची धावपळ

Establishment quake | प्रस्थापिताना हादरा

प्रस्थापिताना हादरा

Next

 दत्ता महाले येवला
यंदा सायगाव गण सर्वसाधारण झाला आहे. दहा वर्षांपूर्वी या गणाचा अंदरसूल गटामध्ये समावेश होता, मात्र नव्याने निर्माण झालेल्या राजापूर गटामुळे तालुक्यातील सर्वच गट व गणाची गावे बदलली गेल्याने प्रस्थापितांना हादरा बसला असून, बहुसंख्य मतदार सायगाव येथे असतानादेखील सायगाव गावाचा यापूर्वी स्वतंत्र गणाची निर्मिती झाल्यापासून सायगाव शिवाय अन्य कोणताही गावाचा उमेदवार या गणात निवडून न आल्याचा इतिहास आहे.
सायगाव गण हा राजापूर गटात गेल्याने धामणगाव, नागडे, मातुलठाण ही गावे सायगाव गणातून तुटल्याने सायगाव गणाचा या तीन गावांशी नेहमीचा दैनंदिन संबंध संपुष्टात आल्याने गणाच्या निवडणुकीचे चित्र बदलले आहे. कारण यापूर्वी राजकीय नेते मंडळींनी गणातील गावांमध्ये सोयरे संबंध प्रस्थापित केले होते. त्यामुळे राजकारण करणे सोपे होते. आता मात्र अनेकांना गण विभाजनाचा फटका बसला आहे. त्यामुळे सायगावची मतदारसंख्या इतर गावांच्या तुलनेत सर्वाधिक असतानादेखील पूर्वभागातील चार ते पाच गावे एकत्र आली तर निवडणुकीचे चित्र बदलू शकणार आहे. याचे उदाहरण म्हणजे यापूर्वीच्या पंचवार्षिक निवडणुकीत या गणातील सर्वात छोट्या गावातील राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला आहे. तालुक्याच्या उत्तर-पूर्व भागात असलेल्या सायगाव गणात बऱ्याच प्रमाणात ओसाड भाग असल्याने या परिसरात हरीण, तरस यांसह विविध जंगली जनावरांचा वावर आहे. बऱ्याच वर्षांपासून दुष्काळी गाव म्हणून या गावची ओळख आहे. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी या गावात मुंबई येथील हवामान खात्याच्या शास्त्रज्ञांनी आकाशात शुगर रॉकेट सोडून पाऊस पाडण्यासाठी प्रयत्न केले होते हे सर्वज्ञात आहे.
सायगाव गणात १४ गावांचा समावेश असून, गणाची एकूण मतदारसंख्या २२ हजार ९०० इतकी आहे. या गणात सायगाव, गवंडगाव, वाघाळे, डोंगरगाव, पिंपळखुटे खु., तळवाडे, कौठखेडे, आड सुरेगाव, पिंपळ खुटे बु।।, भुलेगाव, अंगुलगाव, गारखेडे, पांजरवाडी, देवठाण ही गावे आहेत. सर्वाधिक मतदारसंख्या सायगावतच आहे. सायगाव गण हा पूर्वाश्रमीचा कॉँग्रेसचा, तर आमदार छगन भुजबळ यांच्या कारकिर्दीत राष्ट्रवादीच्या प्राबल्याखाली आहे. या गणातून सायगाव येथील कै. दगू खैरनार, वामनराव खैरनार यांना पंचायत समिती सदस्य व सभापतिपदाच्या वारंवार संधी मिळाल्या आहेत. सायगाव गावातील अनेक दिग्गज नेते एकत्र आल्याने इतिहास घडण्याची स्थिती आहे असे बोलले जाते. यापूर्वी अंदरसूल गणातील देवळाणे येथील रामदास काळे यांना गावातील मतदारांनी निवडून दिले आहे.
१५ वर्षांपूर्वी कॉँग्रेस पक्षाने गावात उमेदवारी न दिल्याने स्थानिक लोकांनी पुन्हा सेना-भाजपा युतीच्या उमेदवाराला उभे करून अनुसूचित जाती-जमाती जागेवर निवडून दिले होते. त्यानंतर पुन्हा आरक्षणात राष्ट्रवादी कॉँग्रेसचा उमेदवार विजयी झाला होता.
सायगाव गणात वेळोवेळी निवडून आलेल्या सदस्यांनी यापूर्वी या गणासाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मोठा हातभार लावला असून, गणातील बऱ्याचशा गावांमध्ये ३८ गाव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाणीपुरवठा केला जात असून, महिला वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे. सायगाव गावात श्रेणी २ या दर्जाचा पशुसंवर्धन दवाखाना मंजूर असून, सध्या कार्यरत आहे. रुग्णांच्या सेवेसाठी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे.

Web Title: Establishment quake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.