जिल्हा परिषदेत टंचाई कक्षाची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 12:22 AM2018-11-19T00:22:27+5:302018-11-19T00:47:58+5:30
जिल्ह्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे यांनी स्वतंत्र दुष्काळ निवारण कक्ष स्थापन करण्याची घोषणा केली होती. त्याप्रमाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने टंचाई कक्षाची स्थापना केली असून, यामध्ये सात कर्मचाऱ्यांचा समावेश केला आहे.
नाशिक : जिल्ह्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे यांनी स्वतंत्र दुष्काळ निवारण कक्ष स्थापन करण्याची घोषणा केली होती. त्याप्रमाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने टंचाई कक्षाची स्थापना केली असून, यामध्ये सात कर्मचाऱ्यांचा समावेश केला आहे.
शासनाने जिल्ह्यातील आठ तालुके दुष्काळी जाहीर केले आहे. दुष्काळी परिस्थितीत कृती आराखड्यातील उपाययोजनांची अंमलबजावणी करणे, टंचाई कालावधीत राबविण्यात येणाºया उपाययोजनांबाबत येणाºया अडचणींचे निराकरण करणे, विविध माहिती तयार करणे, विविध बैठकांना उपस्थित राहणे आदी विविध टंचाई निवारणाची काम करावयाची आहेत. या कक्षात सात कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून कक्ष प्रमुख म्हणून उप कार्यकारी अभियंता ए. एन. पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हा कक्ष सातही दिवस कार्यरत राहणार आहे. अध्यक्ष शीतल सांगळे यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली टंचाई कक्ष स्थापन करण्यात आल्याचे कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम ठाकूर यांनी सांगितले.