दापूरमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:15 AM2021-05-06T04:15:16+5:302021-05-06T04:15:16+5:30
जिल्हा परिषद, पंचायत समिती, आरोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासन यांच्या सहकार्याने सदरचा विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला असून, दोन ...
जिल्हा परिषद, पंचायत समिती, आरोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासन यांच्या सहकार्याने सदरचा विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला असून, दोन दिवसापूर्वी खासदार हेमंत गोडसे व माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या उपस्थितीत विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला आहे.
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असतानाच अनेक रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना, कमी प्रमाणात लक्षणे आढळलेल्या रुग्णांना स्वतंत्र राहण्याची व्यवस्था नव्हती. शिवसेना युवा नेते उदय सांगळे यांच्या संकल्पनेतून सर्व सुविधा असलेला विलगीकरण कक्ष दापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत साकारण्यात आला आहे. ऑक्सिजनयुक्त बेड असलेला पहिला कक्ष असून, तीन ऑक्सिजनयुक्त बेड कक्षात असून, वीज, पाणी, स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. कक्षात राहणाऱ्या गरजू व्यक्तींना जेवणाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे डॉक्टर, आरोग्यसेवक, आशा कार्यकर्ती, अंगणवाडीसेविका या रुग्णांची देखभाल ठेवणार आहेत. गावातील संत निरंकारी मंडळाचे सेवेकरीही मदतीसाठी राहणार आहेत. दापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी दिवसभरात दाखल झालेल्या रुग्णांची तीन वेळा तपासणी करणार आहेत. तसेच ग्रामपंचायतीने विलगीकरण कक्षास मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
फोटो - ०५ दापूर १ - विलगीकरण कक्ष
===Photopath===
050521\05nsk_24_05052021_13.jpg
===Caption===
विलगीकरण कक्ष