उपनगरांमध्ये ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 01:27 AM2019-09-03T01:27:30+5:302019-09-03T01:27:54+5:30

गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, अशा गगनभेदी घोषणा देत गुलालाची उधळण व ढोल-ताशांच्या ठेक्यावर लाडक्या बाप्पांचे मोठ्या भक्तिमय वातावरणात गणेशभक्तांनी जल्लोषात स्वागत करून श्रींची गणेशचतुर्थीनिमित्त विधिवत प्रतिष्ठापना केली.

 Establishment of 'Shri' in the suburbs | उपनगरांमध्ये ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना

उपनगरांमध्ये ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना

Next

पंचवटी : गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, अशा गगनभेदी घोषणा देत गुलालाची उधळण व ढोल-ताशांच्या ठेक्यावर लाडक्या बाप्पांचे मोठ्या भक्तिमय वातावरणात गणेशभक्तांनी जल्लोषात स्वागत करून श्रींची गणेशचतुर्थीनिमित्त विधिवत प्रतिष्ठापना केली. लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी सोमवारी सकाळपासून घराघरातील कुटुंबातील सदस्य तयारीला लागले होते.
लाडक्या गणरायाचे घरी तसेच मंडळाच्या ठिकाणी आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी करून मोदक, खिरापत वाटप करण्यात आली. गणेशचतुर्थीनिमित्त परिसरातील सार्वजनिक मंडळांच्या वतीने सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत गणेशभक्त पारंपरिक वेशभूषा करून सहभागी झाले होते. बाप्पांच्या आगमनाच्या तयारीसाठी सकाळपासून घराघरात सजावट करण्यात आली. सोमवारी ठरलेल्या शुभमुहूर्तावर पंचवटीत विघ्नहर्त्या गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. पंचवटी परिसरात शंभरहून अधिक छोट्या-मोठ्या गणेशोत्सव मंडळांनी गणेशाची विधिवत पूजन करून प्रतिष्ठापना केली. परिसरातील गणेशमूर्ती स्टॉलवर सकाळपासून गणेश भक्तांची मूर्ती खरेदीसाठी गर्दी झाल्याचे चित्र दिसून आले. रस्त्यावर श्रींची मूर्ती नेणारे गणेशभक्त ‘गणपती बाप्पा मोरया’ असा जयघोष करत होते.
पंचवटीतील गजानन चौक, सेवाकुंज येथील आई सप्तशृंगी मित्रमंडळ, अचानक मित्रमंडळ, मालेगाव स्टॅण्ड मित्रमंडळ, भगवतीनगर कला-क्रीडामंडळ, नवीन आडगाव नाका मंडळ, कृष्णनगर मित्रमंडळ, त्रिमूर्तीनगर मित्रमंडळ, गुरुदत्त शैक्षणिक सामाजिक कला क्रीडामंडळ, सत्यबाल मित्रमंडळ, भगवती कला क्रीडामंडळ, कैलास मित्रमंडळ, विक्रांत युवक मित्रमंडळ, यंगस्टार मित्रमंडळ, नागचौक मित्रमंडळ, कै. दत्ताजी मोगरे फ्रेंड सर्कल, दुर्गा फ्रेंड सर्कल, अयोध्यानगरी, मानेनगर, सरदारचौक, संजयनगर, मालवीयचौक, तारवालानगर, आरटीओ कॉर्नर, पेठरोड मित्रमंडळ आदींसह मेरी, म्हसरूळ, आडगाव, पंचवटी कारंजा, नवीन आडगाव नाका, जुना आडगाव नाका, मखमलाबाद, रामवाडी, क्रांतिनगर, दिंडोरीरोड, हिरावाडी, परिसरातील गणेशोत्सव मंडळांनी श्रींची विधिवत प्रतिष्ठापना केली.
सातपूरला ६२ सार्वजनिक गणेश मंडळे
४सातपूर व परिसरात वाजतगाजत श्री गणरायाचे घराघरांमध्ये मोठ्या भक्तिभावाने आगमन झाले. यावर्षी जवळपास लहान-मोठ्या ६२ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून ‘श्रीं’ची स्थापना करण्यात आली. गणरायाच्या आगमनामुळे सर्वत्र मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे. श्री गणरायाच्या आगमनासाठी सातपूर नगरी सज्ज झाली होती. दरम्यान, विविध गणेशोत्सव मंडळांकडून विविध सामाजिक, धार्मिक, पौराणिक, पर्यावरणपूरक देखावे सादर केले जाणार असून, विविध उपक्रमांचेही आयोजन केले जाणार आहे. तसेच पूरग्रस्तांना मदत करण्यात येणार आहे.

Web Title:  Establishment of 'Shri' in the suburbs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.