कामगार संघटनेची स्थापना

By Admin | Published: August 29, 2016 12:40 AM2016-08-29T00:40:38+5:302016-08-29T00:45:36+5:30

सप्तशृंगगड : देवी संस्थानमध्ये आता संघटनेचा प्रवेश

Establishment of trade union | कामगार संघटनेची स्थापना

कामगार संघटनेची स्थापना

googlenewsNext

 सप्तशृंगगड : सप्तशृंगगडावरील सप्तशृंगी देवी संस्थानमध्ये आज तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या न्यायहक्कासाठी व व्यवस्थापकांच्या मनमानी कारभाराविरोधात संघटना स्थापन केली. देवी संस्थानच्या प्रवेशद्वाराजवळ नाशिक येथील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते संघटनेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले.
यावेळेस सेवाज्येष्ठतानुसार कायम करणे, कर्मचारी वर्गास महागाई भत्ता देण्यासह विविध मागण्या करण्यात आल्या.
या मागण्यांसाठी व विविध समस्या सोडविण्यासाठी या कामगार संघटनेची स्थापना करण्यात आली. यावेळेस देवी संस्थानमधील भक्तनिवास विभागप्रमुख दिलीप पवार व मुरलीधर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली १४५ कर्मचाऱ्यांनी सभासदत्व स्वीकारून या संघटनेमध्ये प्रवेश केला. यावेळेस नाशिक येथील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमोर समस्या मांडण्याबरोबरच व्यवस्थापक करीत असलेल्या अन्यायाविरोधात आवाज उठविऱ्यात आला. यावेळेस सर्व कर्मचारी उपस्थित होते. विशेषत: महिला कर्मचाऱ्यांची उपस्थिती लक्षणीय होती.
यावेळेस संघटनेचे कॉ. देवीदास आढोळे (जिल्हा जनरल सेक्र ेटरी), कॉ. व्यंकट कांबळे, कॉ. तुकाराम सोनजे (उपाध्यक्ष), विकास गुच्छात आदिंसह देवी संस्थानचे नारद आहिरे, प्रकाश जोशी, चिंतामण आहिरे, ग्रामपंचायत सदस्य गणेश बर्डे, संदीप बेनके, प्रकाश डंबाळे, राजू महाले, दिनकर खोडे, राजू गांगुर्डे, महिला कर्मचारी मंगल पवार, ताई पवार आदिंसह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Establishment of trade union

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.