आदिवासी ग्रामसेवक, आरोग्यसेवकांची संघटना स्थापन
By admin | Published: July 22, 2014 11:23 PM2014-07-22T23:23:43+5:302014-07-23T00:28:14+5:30
जिल्हा ग्रामसेवक युनियनमध्ये फूट; आदिवासी कर्मचाऱ्यांची वेगळी चूल
नाशिक : आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांनी आदिवासींसाठी स्वायत्त जिल्हे स्थापन करण्याची मागणी केल्यानंतर आता शासकीय स्तरावर त्याचे पडसाद उमटू लागले असून, शंभर टक्के आदिवासी भागातील आदिवासी ग्रामसेवक, ग्रामविस्तार अधिकारी, विस्तार अधिकारी, आरोग्यसेविका, आरोग्यसेवक, आरोग्य सहायिका यांची स्वतंत्र आदिवासी ग्रामसेवक व आरोग्यसेविका संघटना स्थापन करण्यात आली आहे.
या संस्थेच्या वतीने नुकताच पंचवटी परिसरातील नाथकृपा लॉन्स येथे सर्वपक्षीय मेळावा घेऊन त्यात आदिवासी बांधवांवर होणारे अन्याय-अत्याचार रोखण्यासाठीच ही संघटना स्थापन करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.
विशेष म्हणजे, आजतागायत नाशिक जिल्ह्णात ग्रामसेवक युनियन एकच असताना, आता आदिवासी ग्रामसेवक युनियनची स्थापना करण्यात आली असून, अध्यक्षपदी डी. के. चौधरी, मानद अध्यक्षपदी के. डी. गायकवाड, कार्यकारी अध्यक्ष एन. डी. गावित, सचिवपदी पी. जी. गावित यांची निवड करण्यात आली
आहे.
नाथकृपा येथे झालेल्या संघटनेच्या पहिल्याच मेळाव्यात खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार धनराज महाले, माजी आमदार नरहरी झिरवाळ, नगरसेविका रंजना भानसी, गणेश चव्हाण, परशुराम वाघेरे, चिंतामण गायकवाड, राम चौरे, नंदुरबारचे अध्यक्ष वळवी, आदिवासी शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष मोतीराम पवार, संघटनेचे जे. ए. गारे, बी. एन. ठाकरे, ई. टी. भोये, के. एम. भरसट, गणेश गांगुर्डे, डी. व्ही. गायकवाड, सचिन धूम आदि उपस्थित असल्याची माहिती प्रसिद्धीप्रमुख व्ही. टी. तलवारे, व्ही. टी. पवार व पी. यू. गावित यांनी दिली. (प्रतिनिधी)