नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादनाचा गावनिहाय अंदाज बांधा - भारती पवार

By अझहर शेख | Published: March 9, 2023 05:55 PM2023-03-09T17:55:03+5:302023-03-09T18:00:08+5:30

नाशिक : कांद्याला योग्य हमीभाव मिळत नसल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला असून अवकाळी पावसाचाही फटका आता कांद्याला बसला ...

Estimate village wise onion production in Nashik district says Bharti Pawar | नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादनाचा गावनिहाय अंदाज बांधा - भारती पवार

नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादनाचा गावनिहाय अंदाज बांधा - भारती पवार

googlenewsNext

नाशिक : कांद्याला योग्य हमीभाव मिळत नसल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला असून अवकाळी पावसाचाही फटका आता कांद्याला बसला आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला. याबाबत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी गुरुवारी (दि.९) जिल्हा प्रशासनासह कृषी विभागाला विविध सुचना देत कांदा पीकाच्या क्षेत्राचे गावनिहाय अहवाल तयार करण्याचे आदेश दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात कांदा दराबाबत गुरुवरी आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा उपनिबंधक डॉ. सतीश खरे, जिल्हा कृषी अधिकारी विवेक सोनवणे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी, दिल्ली नाफेडचे उप व्यवस्थापक निखिल पाडदे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांच्यासह सबंधित विभागाचे अधिकारी व जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटनाचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते.

नाशिक जिल्ह्यात सध्या कांदा पिकाला योग्य भाव मिळण्यासाठी, जिल्ह्यातील कांद्याचे क्षेत्र व त्याप्रमाणात होणारे कांद्याचे उत्पादनाचा अंदाज येणे आवश्यक आहे. याकरिता कृषी विभागाने जिल्ह्यातील कांदा पिकाच्या एकूण क्षेत्राची माहिती कृषी सहायकांच्या मदतीने गोळा करावी, अशी सूचना पवार यांनी यावेळी केली. ‘नाफेड’द्वारे केल्या जाणाऱ्या कांदा खरेदी केंद्रांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत व्यापक पद्धतीने पोहचविण्यावर भर देणे गरजेचे आहे, मात्र तसे होताना दिसत नाही, अशी खंतदेखील त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी कांदा उत्पादक शेतकरी संघटनांचे पदाधिकारी व प्रतिनिधीनी कांदा दर, खरेदी व निर्यात धोरणाबाबत त्यांच्या अपेक्षा, मागण्या मांडल्या. तसेच जिल्ह्यातील कांदा लागवड क्षेत्राबाबत सोनवणे यांनी माहिती सादर केली.

तफावत खपवून घेतली जाणार नाही!

कृषी विभाग व बाजार समितींनी तयार केलेल्या अहवालात कांदा उत्पादनाबाबत कुठलीही तफावत नसावी. जिल्ह्यात कांदा उत्पादन क्षमता चांगली असल्याने निर्यात खुली आहे. कांदा निर्यात करतांना पोर्टवरील प्लगइन पॉईंट वाढविणे, कांदाचाळी व प्रक्रीया उद्योग वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे भारती पवार यांनी सांगितले. नाफेडकरून लाल कांद्याची खरेदी सुरू आहे.

कांदा खरेदीबाबत राज्य सरकार सकारात्मक

नाफेड मार्फत करण्यात येणारी कांदा खरेदीचा दर टप्प्याने वाढत आहे. त्याचप्रमाणे उन्हाळ कांदा खरेदीसाठी देखील नियोजन करणे आवश्यक आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना येणारा उत्पादन खर्च व त्यानुसार होणारा नफा याअनुषंगाने कांद्याला भाव मिळण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जात आहेत. कांदा खरेदीबाबत राज्य सरकारदेखील सकारात्मक असल्याचे त्या म्हणाल्या.

Web Title: Estimate village wise onion production in Nashik district says Bharti Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.