बाधित रुग्णाच्या संपर्कात ८० व्यक्तींचा अंदाज प्रत्येकाची खातरजमा : ३० वैद्यकीय पथकाची निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 12:55 AM2020-03-31T00:55:22+5:302020-03-31T00:57:39+5:30
नाशिक : जिल्ह्णातील ग्रामीण भागात सापडलेल्या कोरोनाबाधित तरुणाच्या संपर्कात गेल्या अठरा दिवसांत जवळपास ८० व्यक्ती आल्याचा अंदाज त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरून व्यक्त केला जात असून, अशा व्यक्तींचा शोध घेण्याचे मोठे आव्हान आरोग्य विभागासमोर उभे ठाकले आहे.
नाशिक : जिल्ह्णातील ग्रामीण भागात सापडलेल्या कोरोनाबाधित तरुणाच्या संपर्कात गेल्या अठरा दिवसांत जवळपास ८० व्यक्ती आल्याचा अंदाज त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरून व्यक्त केला जात असून, अशा व्यक्तींचा शोध घेण्याचे मोठे आव्हान आरोग्य विभागासमोर उभे ठाकले आहे. त्यासाठी सर्व बाजूंची खातरजमा करण्याचे काम सुरू करण्यात आले असून, जवळपास ३० वैद्यकीय पथकांची निर्मिती करण्यात आली आहे.
बाधित रुग्णाची प्रकृती स्थिर असून, तो आरोग्य उपचाराला प्रतिसाद देण्याबरोबरच आवश्यक असलेली माहितीही देत असल्यामुळे गेल्या अठरा दिवसांत तो कोठे कोठे गेला व कोणाच्या संपर्कात आला याची माहिती मिळविण्याचे काम युद्धपातळीवर केला जात आहे. या उपरही त्याच्याकडून सर्व माहिती मिळेलच यावर विसंबून न राहता त्याच्या भ्रमणध्वनीचा क्रमांकाच्या आधारे त्याने अठरा दिवसांत कोठे कोठे वास्तव्य केले व कोणाशी संपर्क साधला यामाध्यमातूनही त्याची माहिती काढली जात आहे. प्रथम दर्शनी आरोग्य विभागाला त्याच्या संपर्कात ८० व्यक्ती आल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून, या व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे. त्याचबरोबर नागरिकांनी स्वत:हूनच पुढे येऊन माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
बाधित रुग्णाचे घर, गावावर सध्या आरोग्य विभागाने लक्ष केंद्रित केले असले तरी, या गावाच्या आसपासची गावेही आरोग्य विभागाने तपासण्याचा निर्णय घेतला व त्यासाठी ३० वैद्यकीय पथके गठीत करण्यात येणार आहे. प्रत्येक पथकात चार सदस्यांचा समावेश असून, प्रत्येक घराघरांत जाऊन श्वसनसंस्थेच्या आजाराच्या सर्व रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. प्रत्येक पथकाने
दररोज किमान ५० ते ६० कुटुंबांना भेटी द्याव्यात, अशा प्रकारचे
नियोजन आरोग्य विभागाने केले आहे.