इथेनॉलचा प्रकल्प लवकरच कार्यान्वित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:12 AM2021-07-18T04:12:00+5:302021-07-18T04:12:00+5:30
कादवा सहकारी साखर कारखान्याचे रोलर पूजन कारखान्याचे संचालक बापूसाहेब पडोळ यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आले. अध्यक्षस्थानी चेअरमन ...
कादवा सहकारी साखर कारखान्याचे रोलर पूजन कारखान्याचे संचालक बापूसाहेब पडोळ यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आले. अध्यक्षस्थानी चेअरमन श्रीराम शेटे होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी चेअरमन श्रीराम शेटे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अधिकारी व कामगारांनी ठेवी दिल्या. शेटे यांनी कारखान्याची वाटचाल विशद करत सांगितले, काळाची पावले ओळखत गाळप क्षमता वाढवली असून अजूनही जादा गाळप क्षमता परवानगी घेऊन वाढवली जाणार आहे. साखरेला भाव व उठाव नसल्याने मोठ्या आर्थिक संकटातून साखर उद्योग जात आहे. त्यामुळे केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीवर भर देत काही सवलती देऊ केल्या आहेत. कादवानेही हा प्रकल्प हाती घेतला आहे, मात्र या प्रकल्पासाठी काही स्वनिधी आवश्यक असून सभासदांना ठेवी ठेवण्याचे आवाहन केले. त्यास सभासदांचा चांगला प्रतिसाद मिळत असून सभासदाबरोबरच बिगरसभासद ठेवी ठेवत आहेत. पुढील हंगाम लवकर सुरू होणार असून त्यादृष्टीने तयारी करत पुढील हंगामात विक्रमी गाळप करण्याच्या तयारीला लागावे, असे आवाहन शेटे यांनी केले. कामगार संचालक तथा कामगार युनियन अध्यक्ष दत्तात्रेय वाकचौरे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी व्हा. चेअरमन उत्तमबाबा भालेराव, ज्येष्ठ सभासद दामोदर शेळके, राजाराम सोनवणे, त्र्यंबक संधान, मधुकर गटकळ, विश्वनाथ देशमुख, दिनकर जाधव, शहाजी सोमवंशी, बाळासाहेब जाधव, सुनील केदार, शिवाजी बस्ते, सुखदेव जाधव, सुभाष शिंदे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन कार्यकारी संचालक हेमंत माने यांनी केले.
फोटो- १७ कादवा शुगर
170721\17nsk_44_17072021_13.jpg
फोटो- १७ कादवा शुगर