शाळांच्या गुणवत्तेचे मुल्यांकन फाईव्ह स्टार पद्धतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 05:41 PM2019-06-18T17:41:59+5:302019-06-18T17:42:13+5:30

जिल्हा गुणवत्ता कक्षाच्या वतीने मंगळवारी शासकीय कन्या शाळेत जिल्हास्तरीय बैठक घेण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांचेही मुल्यमापन आवश्यक असून यासाठी प्रत्येक शाळा व वर्गासाठी फाईव्ह स्टार पध्दत सुरु करण्यात येणार आहे. यामध्ये ८० टक्यापेक्षा जास्त गुण असलेल्या शाळा व वर्गासाठी पाच स्टार,

The evaluation of the quality of schools is done by five stars | शाळांच्या गुणवत्तेचे मुल्यांकन फाईव्ह स्टार पद्धतीने

शाळांच्या गुणवत्तेचे मुल्यांकन फाईव्ह स्टार पद्धतीने

Next
ठळक मुद्देनरेश गिते : गुणवत्तेशी शिक्षकांची वेतनवाढ जोडणार

लोकमत न्युज नेटवर्क
नाशिक : जिल्हापरिषदेच्या शाळांच्या शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची जबाबदारी शिक्षकांची असून, जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांना व वर्गांच्या गुणवत्तेचा आढावा घेण्यासाठी यापूढे फाईव्ह स्टार पध्दतीने मुल्यांकन करण्यात येणार आहे त्यासाठी प्रत्येक महिन्यात विद्यार्थ्यांची गुणवत्ता चाचणी घेण्यात येणार आहे. प्राथमिक शाळांमधील शिक्षकांची वेतनवाढ गुणवत्तेशी जोडणार येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिली.


जिल्हा गुणवत्ता कक्षाच्या वतीने मंगळवारी शासकीय कन्या शाळेत जिल्हास्तरीय बैठक घेण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांचेही मुल्यमापन आवश्यक असून यासाठी प्रत्येक शाळा व वर्गासाठी फाईव्ह स्टार पध्दत सुरु करण्यात येणार आहे. यामध्ये ८० टक्यापेक्षा जास्त गुण असलेल्या शाळा व वर्गासाठी पाच स्टार, ७० ते ८० टक्के दरम्यान गुण असलेल्या शाळांसाठी चार स्टार, ६० ते ७० टक्यांसाठी तीन स्टार, ५० ते ६० टक्के गुण असणा-या शाळांसाठी २ स्टार व ४० ते ५० टक्यांच्या दरम्यान गुण असलेल्या शाळा व वगार्साठी १ स्टार याप्रमाणे मुल्यांकन केले जाणार आहे. त्याचप्रमाणे ४० टक्यांपेक्षा कमी गुण असलेल्या शाळांसाठी १ ब्लॅक स्पॉट, ३० टक्यांपेक्षाही कमी गुण असलेल्या शाळांसाठी २ ब्लॅक स्पॉट देण्यात येणार आहे. ज्या शिक्षकांना १ किंवा २ ब्लॅक स्पॉट मिळतील त्यांची वेतनवाढ रोखण्यात येणार असून यामध्ये सुधारणा करण्यासाठी त्यांना ६ महिने संधी देण्यात येणार असून अपेक्षित सुधारणा झाल्यास वेतनवाढ पूर्ववत करण्याचे ठरविण्यात आले.
गुणवत्तेचे मुल्यमापन करण्यासाठी दरमहा विद्यार्थ्यांची गुणवत्ता चाचणी घेण्यात येणार असून विद्यार्थ्यांना त्यांच्या वहीमध्येच प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी देण्यात येणार आहे. प्रत्येक शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेचे मुल्यांकन करावयाचे असून त्यानंतर मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेचे प्रतिनिधी यांचेमार्फत पुर्नमुल्यांकन करण्यात येणार आहे. विविध कंपन्यांच्या सीएसआर मधून शाळांसाठी संगणक, प्रोजेक्टर घेण्यात येणार असून १०० शाळा डिजिटल करण्यात येणार आहेत. तसेच व्हच्युअल क्लासरुमव्दारे विविध तज्ञ शिक्षकांचे व्याख्यान तसेच उच्च पदस्थ अधिकारी, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांनी केले. बैठकीस माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांच्यासह प्रादेशिक, विद्या प्राधिकरण संस्थेचे ज्येष्ठ अधिव्याख्याता, गट शिक्षण अधिकारी, विषयानिहाय तज्ञ शिक्षक उपस्थित होते.

Web Title: The evaluation of the quality of schools is done by five stars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.