महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर बाइक रॅलीतून स्त्रीशक्तीच्या सामर्थ्याचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2020 07:21 PM2020-03-07T19:21:40+5:302020-03-07T19:24:59+5:30
जागतिक महिला दिनानिमित्त ‘वॉव : वुमन आॅफ विस्डम’ फाउंडेशनतर्फे शनिवारी बाइक रॅली काढण्यात आली. यावेळी दुचाकी वेगवेगळ्या पद्धतीने सजवित हेल्मेटसह विविध क्षेत्रांत लौकिक मिळविलेल्या आदर्श महिलांचा वेश परिधान करीत नारीशक्तीला सलाम करण्यात आला, तर काहींनी लष्करी गणवेशातील. फुलपाखरांचा व प्रोफेशनल्स रायडिंगचे पोषाख परिधान करीत रॅलीत सहभाग घेतला.
नाशिक : नऊवारी साडी, फेटा, नथ, हातात पाटल्या, बाजूबंद, कमरेला छल्ला अशा पारंपरिक वेशभूषेसह मोपेड, इलेक्ट्रिक बाइक आणि स्पोर्ट बाइक्ससह रस्त्यावरून चालताना लक्षवेधून घेणाऱ्या बुलेटवर स्वार होत नाशिक कर महिलांनीमहिला दिनाचे औचित्य साधून शहरातून एक दिवस आधी ‘जल्लोषात बाइक रॅली’ काढून स्त्रीशक्तीच्या सामर्थ्याचे दर्शन घडविले.
जागतिक महिला दिनानिमित्त ‘वॉव : वुमन आॅफ विस्डम’ फाउंडेशनतर्फे शनिवारी (दि.७) बाइक रॅली काढण्यात आली. यावेळी महिलांनी त्यांच्या दुचाकी वेगवेगळ्या पद्धतीने सजवित हेल्मेटसह विविध क्षेत्रांत लौकिक मिळविलेल्या आदर्श महिलांचा वेश परिधान करीत नारीशक्तीला सलाम करण्यात आला, तर काहींनी लष्करी गणवेशातील. फुलपाखरांचा व प्रोफेशनल्स रायडिंगचे पोषाख परिधान करीत रॅलीत सहभाग घेतला. पोलीस आयुक्तविश्वास नांगरे-पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर, मानवता कॅन्सर सेंटरच्या डॉ. श्रुती काटे, वॉव फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष अश्विनी न्याहारकर, रेखा देवरे, विद्या मुळाने, नीलिमा चुंभळे, उज्ज्वला बोधले, सपना बुटे, शिल्पा दरगोडे आदींनी ठक्कर डोम येथून रॅलीला हिरवा झेंडा दाखविला. यावेळी पौर्णिमा चौगुले-श्रींगी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर, ज्योती ठक्कर आदींची उपस्थिती होती. ‘वाहन चालवितांना मोबाइलचा वापर टाळा’, महिलांना द्या सन्मान, देश बनेल महान’, ‘हॅपी टू ब्लीड’, ‘सासू सून मित्र, सारे घर तृप्त’, असे संदेश देत महिलांनी ठक्कर डोमपासून जेहान सर्कल, जुना गंगापूर नाका, मॉडेल कॉलनी, समर्थनगर, महात्मानगरकडून ठक्कर डोम, अशी रॅलीमार्गावर जनजागृती केली. निर्भया पोलिसांचे पथक आणि नाशिक सायकलिस्टने रॅलीचे नेतृत्व केले. दरम्यान, केतकी कोकीळ यांनी महिलांना सॅनिटरी पॅड डिस्पोजल मशीनबद्दल माहिती देऊन प्रात्यक्षिक दाखविले.