‘भारत बंद’नंतरही इंधन दरवाढ सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 01:51 AM2018-09-14T01:51:59+5:302018-09-14T01:52:30+5:30

पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या मुद्द्यावर काँग्रेसह सुमारे २१ विरोधी पक्षांनी केंद्र सरकारविरोधात देशव्यापी आंदोलन करीत भारतबंद आंदोलनत केल्यानंतरही इंधनाच्या किमतीमध्ये सातत्याने होणारी वाढ सुरूच असून, पेट्रोल ८८.८३ रुपये, तर पेट्रोल ७६.८१ रुपयांपर्यंत महागले आहे.

 Even after the 'Bharat bandh' fuel price hike has been made | ‘भारत बंद’नंतरही इंधन दरवाढ सुरूच

‘भारत बंद’नंतरही इंधन दरवाढ सुरूच

Next
ठळक मुद्देसोशल मीडियातून संतप्त प्र्रतिक्रिया

नाशिक : पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या मुद्द्यावर काँग्रेसह सुमारे २१ विरोधी पक्षांनी केंद्र सरकारविरोधात देशव्यापी आंदोलन करीत भारतबंद आंदोलनत केल्यानंतरही इंधनाच्या किमतीमध्ये सातत्याने होणारी वाढ सुरूच असून, पेट्रोल ८८.८३ रुपये, तर पेट्रोल ७६.८१ रुपयांपर्यंत महागले आहे.
केंद्र सरकारने डायनॅमिक फ्यूल प्राइसिंगच्या माध्यमातून प्रतिदिन रिव्हाइज रिटेल फ्यूल प्राइस सिस्टिमची सुरु वात केल्यानंतर पेट्रोल रोजच्या रोज बदलणाऱ्या किमतींमुळे गेल्या वर्षभराच्या कालावधीत पेट्रोलचे दर जवळपास १४ रुपयांनी वाढून ८८.८३, तर डिझेल तब्बल १७ रुपयांनी महागले आहे, याने ७४.८७ रुपयांपर्यंत पोहोचले आहे. डिझेलच्या किमतीत रोजच्या रोज होणाºया बदलांमुळे इंधनाच्या दरात हळूहळू वाढ सर्वसामान्य ग्राहकांच्या लक्षात येत नाही. परंतु, अशाप्रकारे होणारी ही दरवाढ महागाईला कारणीभूत ठरत आहे. पेट्रोल व डिझेलच्या दरात गेल्या चार वर्षांत झालेली ही विक्रमी वाढ असून, दरवाढीविरोधात नाशिककरांनी संताप व्यक्त करीत पेट्रोलियम पदार्थांनाही जीएसटी अंतर्गत आणण्याची मागणी केली आहे. देशभरात वर्षभरापूूर्वी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत थोडी जरी वाढ झाली तरी, सर्वत्र गोंधळ होत असल्याचे पहायला मिळत होते. परंतु, गेल्या सात ते आठ महिन्यांपासून शहरात इंधनाच्या किमतीत रोजच्या बदलामुळे नियमितपणे हळूहळू वाढ होत असताना महागाईही संथगतीने वाढत आहे.
संथगतीने वाढणारी महागाई आणि इंधनाची दरवाढ ग्राहकांचे कंबरडे मोडणारी ठरू लागली आहे. त्यामुळे या दरवाढीविरोधात सोशल माध्यमांतून संतप्त प्रतिक्रया उमटत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री राजनाथसिंह यांच्यासह भाजपा नेत्यांनी २०१४ निवडणुकीपूर्वी मतदारांना दिलेल्या आश्वासनांच्या व्हिडीओ क्लिप फिरवून नागरिक सरकार विरोधात तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.

Web Title:  Even after the 'Bharat bandh' fuel price hike has been made

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.