उपाययोजना करूनही अळीचा प्रादुर्भाव वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 01:31 AM2019-07-13T01:31:08+5:302019-07-13T01:31:45+5:30
माणिक गणपत बिरारी या शेतकऱ्याच्या तीन एकर क्षेत्रावरील मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला असून, लष्करी अळीच्या बंदोबस्तासाठी अनेक उपाययोजना करूनही दिवसेंदिवस प्रादुर्भाव वाढत आहे.
कंधाणे : येथील माणिक गणपत बिरारी या शेतकऱ्याच्या तीन एकर क्षेत्रावरील मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला असून, लष्करी अळीच्या बंदोबस्तासाठी अनेक उपाययोजना करूनही दिवसेंदिवस प्रादुर्भाव वाढत आहे.
अळीने संपूर्ण क्षेत्राचे नुकसान केल्याने या शेतकºयाला हजारो रूपयांचा आर्थिक फटका बसला आहे. कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नुकसानग्रस्त क्षेत्राला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली आहे. परिसरात आधीच वरुणराजाने डोळे वटारले असून, या भागात पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्याने बळीराजा चिंतातुर झाला आहे. ज्या शेतकºयांनी विहिरीच्या पाण्यावर मका पिकाची लागवड केली आहे. त्यावरही लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने बळीराजा धास्तावला आहे.
माणिक बिरारी या शेतकºयाने आपल्या व मुलाच्या मालकीच्या तीन एकर क्षेत्रावर विहिरीच्या पाण्यावर १ जून रोजी मका पेरणी केली. पेरणी केल्यानंतर वीस ते बावीस दिवसात या क्षेत्रावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आला. या अळीच्या बंदोबस्त करण्यासाठी संपूर्ण क्षेत्रावरील पिकावर अनेक महागड्या कीटनाशकांची फवारणी केली;
पण अळीचा प्रार्दुभाव वाढत असून संपूर्ण पीक वाया गेले आहे. आधीच गेल्या वर्षभर दुष्काळाच्या झळा सहन केल्या, मागच्या वर्षीही दुष्काळामुळे मका पीक वाया गेले. यावर्षी
हजारो रुपये खर्चून मका पीक
जतन केले. मात्र लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने संपूर्ण पीक वाया गेले आहे.