मोबाइलच्या जमान्यातही लँडलाइन, रेंज नसल्याने वाढली गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:18 AM2021-09-07T04:18:42+5:302021-09-07T04:18:42+5:30
नव्वदीच्या दशकात टेलिकम्युनिकेशनमुळे जगात क्रांती झाली आहे. मोबाइलमुळे संपर्क साधन खिशात तर राहू लागलेच शिवाय व्हॉटस्अपसारख्या सुविधा ऑनलाइन पेंमेट ...
नव्वदीच्या दशकात टेलिकम्युनिकेशनमुळे जगात क्रांती झाली आहे. मोबाइलमुळे संपर्क साधन खिशात तर राहू लागलेच शिवाय व्हॉटस्अपसारख्या सुविधा ऑनलाइन पेंमेट आणि अन्य कारणांमुळे ‘दुनिया मुठ्ठी मे’ अशी स्थिती आहे. मात्र, त्यांनतरही जिल्ह्यात लँडलाइनचा वापर कमी होत गेला असला तरी कायम आहे. बीएसएनएलचे नाशिक जिल्ह्यात साडेतीन ग्राहक असले तरी साठ हजार लँडलाइन कायम आहे, असे बीएसएनएलचे महाप्रबंधक नितीन महाजन यांनी सांगितले.
माेबाइलचा वापर वाढला असला तरी अनेक वेळा रेंज मिळत नाही. तसेच अनेक घरांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना मोबाइल हाताळता येत नाही. तसेच कार्यालयीन कामासाठी लँडलाइन आवश्यक ठरते. विशेषत: बँकांमध्ये देखील लँडलाइन आवश्यक आहे, त्यामुळे माेबाइलच्या जमान्यातही लँडलाइनचा वापर कायम आहे.
इन्फो...
जिल्ह्यात शंभर-दोनशे क्वाइन बॉक्स
नाशिक जिल्ह्यात शंभर-दोनशे क्वाइन बॉक्स आहेत. ते नगण्य असले तरी अत्यंत छोट्या गावात जेथे मोबाइल चालत नाही आणि तो परवडत नाही अशा ठिकाणी मात्र अजूनही क्वाइन बॉक्स कायम आहेत. बीएसएनएचे क्वाइन बॉक्सच सध्या उपलब्ध आहेत.
इन्फो...
क्वाइन बॉक्स वापरणारे केाण?
नाशिकमध्ये छोटी गावे आणि खेड्या-पाड्यात जेमतेम क्वाइन बॉक्स आहेत. मजूर आणि ग्रामीण भागातील दुर्बल घटक ज्यांची मोबाइल घेण्याची ऐपत नाही, असा वर्ग क्वाइन बॉक्स वापरतात.
इन्फो...
अवघे ६० हजार लँडलाइन
जिल्ह्यात लँडलाइनमध्ये बीएसएनएलची मक्तेदारी असली तरी अवघे साठ हजार लँडलाइन आहेत. त्या तुलनेत मोबाइल ग्राहकांची संख्या साडेतीन लाख आहे. लँडलाइन हे ब्रॉड बँडशी जोडल्याने अनेक ठिकाणी लँडलाइन कायम आहेत.
इन्फो...
म्हणून लँडलाइन आवश्यकच
कोट...
मोबाइलपेक्षा लँडलाइनाचा वापर सोपा आहे. त्यातच घरात रेंज मिळत नाही. त्यामुळे अडचण येते. मोबाइल कंपन्या रेंजबाबत जागृक नाही त्यामुळे लँडलाइन आवश्यक वाटते.
- वसंतराव राऊत, द्वारका
कोट...
कार्यालयात कामकाज करण्यासाठी लँडलाइन आवश्यक आहे. विशेषत: कोणा ग्राहकाचे महत्त्वाचे काम असेल आणि संबंधित कंपनीचा अधिकारी बाहेर असेल तर संबंधित ग्राहक किंवा व्यक्तीला थेट लाइनवरून मुख्य कार्यालयाशी बोलणे सोपे पडते.
- आनंद तांदूळवाडकर, शरणपूर