...मरणानेही सुटका नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 11:25 PM2017-08-08T23:25:24+5:302017-08-09T00:16:57+5:30
माणूस जिवंत असेपर्यंत अनेक यातना भोगत असतो. मरण म्हणजे या सर्व यातनातून सुटका होणे असे समजले जाते. मात्र पेठ तालुक्यातील गावंध येथील ग्रामस्थांना मरणानंतरही यातना सहन कराव्या लागत आहे.
पेठ : माणूस जिवंत असेपर्यंत अनेक यातना भोगत असतो. मरण म्हणजे या सर्व यातनातून सुटका होणे असे समजले जाते. मात्र पेठ तालुक्यातील गावंध येथील ग्रामस्थांना मरणानंतरही यातना सहन कराव्या लागत आहे. गावात स्मशानभूमी शेड नसल्याने मृत्यू झाल्यास त्याचे अंत्यसंस्कार करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.
ग्रामस्थांनी लाकडी दांड्या व झाडाच्या फांद्यांनी तात्पुरते शेड तयार केले असून, पाऊस असल्यास प्लॅस्टिक कागदाचा वापर करून अंत्यसंस्कार करण्याची वेळ येते. त्यामुळे जिवंतपणी संघर्ष करत असताना मृत्यूनंतरही मरणयातना भोगण्याची वेळ आली असून, या गावात स्मशानभूमी शेड बांधण्याची मागणी पांडुरंग लहारे, चंद्रकांत लहारे, योगेश कामडी, नारायण लहारे आदी ग्रामस्थांनी केली आहे.