कोरोना निर्बंधाच्या काळातही वाजले सनई चौघडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:15 AM2021-07-29T04:15:18+5:302021-07-29T04:15:18+5:30

नाशिक: कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा आली असली तरी विवाह सोहळ्यांवर त्याचा फारसा परिणाम झाल्याचे दिसून आले नाही. ...

Even during the time of Corona Restriction, Sanai Chaughade rang | कोरोना निर्बंधाच्या काळातही वाजले सनई चौघडे

कोरोना निर्बंधाच्या काळातही वाजले सनई चौघडे

Next

नाशिक: कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा आली असली तरी विवाह सोहळ्यांवर त्याचा फारसा परिणाम झाल्याचे दिसून आले नाही. नाशिक जिल्ह्यात तर नोंदणी विवाह करणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले. ठरलेले विवाह नियोजित वेळेतच व्हावे, यासाठी वधू-वरांनी नेांदणी विवाहाचा पर्याय निवडल्याचे दिसून आले.

कोरोनाच्या निर्बंधामुळे जुळलेल्या विवाहांना अनेक अडचणी आल्या. एकतर लग्नाचा मुहूर्त जवळ आल्याने त्यांना मुहूर्तही चुकविणे शक्य नव्हते. याबरोबरच जास्त लोकही विवाहाला बोलविता येत नसल्याने अशावेळी नोंदणी पद्धतीचा विवाह हाच पर्याय समेार असल्याने या काळात नेांदणी पद्धतीने विवाह करणाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. मार्च ते जुलै २०२१ या कालावधीत नोंदणी पद्धतीने विवाह करणाऱ्यांची संख्या ३०५ इतकी आहे.

नोंदणी विवाहासाठी अवघे १५० रुपये इतके शुल्क लागते. त्यानुसार मार्च ते जुलै या कालावधीत अवघ्या ४५, ७५० रुपयांमध्ये ३०५ विवाह उरकले आहेत. मार्चपासून असलेल्या कोरोनाच्या काळात ठरवून नोंदणी विवाह करण्याचे प्रमाण अधिक असल्याने या निमित्ताने नोंदणी विवाहविषयक जनजागृतीदेखील होण्यास मदत झाली आहे.

कोरोनाच्या या कालावधीत ठरवून नोंदणी विवाह करणाऱ्यांची जशी संख्या वाढलेली दिसते, त्या प्रमाणात लग्नाची नोंदणी करण्यासाठीदेखील दाम्पत्यांकडून प्राधान्य देण्यात आल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे. गेल्या चार महिन्यात अशा प्रकारच्या ५१ जोडप्यांनी आपल्या लग्नाची नोंदणी केलेली आहे.

--इन्फो--

कधी किती झाले नोंदणी विवाह

२०१८--- ८१०

२०१९--- ७३७

२०२०--- ५६०

२०२१--

जानेवारी-- ५६

फेब्रुवारी--- ४९

मार्च ---९६

एप्रिल--- ४४

मे--- ५८

जून--- ६२

जुलै-- ४५

--इन्फो--

सहा महिन्यात ४३६ नोंदी

केारोनाच्या कालावधीत निर्बंध असल्याने नोंदणी विवाहाला प्राधान्य देण्यात आल्याचे दिसून आले. मार्च ते जुलै २०२१ या कालावधीत नोंदणीसाठी ४३६ इतके अर्ज आले होते. त्यापैकी ३०५ विवाहांची नोंदणी होऊ शकली. ज्यांचे वैदिक पद्धतीने विवाह झाले आहेत, असे जोडपेदेखील नोंदणी करतात. त्यांचे ५१ नोंदणी प्रमाणपत्रे देण्यात आली.

--कोट--

मागील वर्षीच विवाहाची तारीख ठरली होती; परंतु मार्च महिन्यात केारोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर असल्याने दोन्ही कुटुंबीयांनी नोंदणी पद्धतीने विवाह करण्याचा निर्णय सामंजस्याने घेतला. नियोजित तारखेलाच विवाह व्हावा, अशी सर्वांची इच्छा होती. त्यानुसार सर्वकाही जुळून आले. नाेंदणी पद्धतीने आम्ही विवाहबद्ध झालो.

- ज्ञानेश शहाणे, तरुण.

काेरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच लग्न जुळून आले. नोकरी बाहेरगावी असल्याने लग्नाला काही अडचणी येतील का, अशी शंका होती. सुदैवाने नोकरी टिकली, त्यामुळे कोणतीही अडचण आली नाही; परंतु नोकरीवर जाणे अपेक्षित असल्याने लग्न पुढे न ढकलता नोंदणी पद्धतीने विवाह करण्यात आला. कुटुंबीयांच्या संमतीने विवाह नोंदणी पद्धतीने झाला.

-- विनोद कडसाने, तरुण.

Web Title: Even during the time of Corona Restriction, Sanai Chaughade rang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.