सिग्नल हिरवा असेल तरीही थांबा : वाहतुकीचा नियम ‘तेव्हा’ बदलतो ...तर तुम्ही सिग्नल पाळू नका !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 12:53 AM2018-02-04T00:53:00+5:302018-02-04T00:53:49+5:30
नाशिक : आपत्कालीन सेवा देणारी वाहने जर सिग्नल असल्यामुळे वाहनांच्या रांगेत अडकून पडलेली असेल तर तुमचा सिग्नल लाल असेल तरी थांबण्याऐवजी वाहने पुढे हाताचा इशारा करून हळुवारपणे मार्गस्थ करावी.
नाशिक : आपत्कालीन सेवा देणारी वाहने जर सिग्नल असल्यामुळे वाहनांच्या रांगेत अडकून पडलेली असेल तर तुमचा सिग्नल लाल असेल तरी थांबण्याऐवजी वाहने पुढे हाताचा इशारा करून हळुवारपणे मार्गस्थ करावी. यावेळी दुसºया मार्गावरील ज्यांचा सिग्नल हिरवा झालेला आहे, त्या वाहनचालकांनी वाहने तत्काळ थांबवावी, असा वाहतुकीचा नियम सांगतो; मात्र याकडे सध्या शहरात दुर्लक्ष होताना दिसत आहे.
शहरातील विविध सिग्नल्सवर ज्या बाजूचा सिग्नल लाल असतो त्या मार्गावरून अनेकदा रुग्णवाहिका येतात. सायरन वाजवित रुग्णवाहिका चालक रुग्णाला रुग्णालयापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्नात असतो; मात्र सिग्नल जेव्हा लागतो तेव्हा रुग्णवाहिकेला वाहनांच्या रांगेमुळे पुढे जाता येत नाही. डावे वळण खुले असल्यास तो तेथून रुग्णवाहिका घेऊन जाण्याचा प्रयत्न करू शकतो, मात्र बेशिस्तीमुळे डाव्या वळणाची जागाही वाहनचालकांनी व्यापलेली असते. अशा स्थितीत समोर उभ्या असलेल्या वाहनचालकांनी रुग्णवाहिकेला मार्ग मोकळा करून देणे क्रमप्राप्त ठरते. ज्या मार्गावर रुग्ण्वाहिका आलेली असेल त्या मार्गावरील रुग्णवाहिकेपुढे असलेल्या सर्व वाहनांनी सिग्नल न पाळता पुढे हाताचा इशारा करत वाहने घेऊन जावी. विरुद्ध मार्गावरील सिग्नल जरी सुटलेला असेल तरी वाहनचालकांनी रुग्णवाहिका मार्गस्थ होईपर्यंत थांबवावे. तर ज्या बाजूचा सिग्नल लाल असेल त्या बाजूची वाहने पुढे मार्गस्थ होण्याचा प्रयत्न करतील.
अज्ञान व अहंकार दूर करावा
सिग्नल हिरवा असेल तर त्या बाजूने वाहने पुढे जातात. लाल सिग्नलच्या दिशेची वाहतूक थांबलेली असते; मात्र जेव्हा याच दिशेने पाठीमागून रुग्णवाहिक ा सायरन वाजवित आली असेल तर सिग्नल पाळणारे वाहनचालक वाहने पुढे मार्गस्थ करून रुग्णवाहिकेला जागा देत नाही, कारण ज्या बाजूचा सिग्नल हिरवा झालेला असतो त्या बाजूची वाहने तेवढ्या क्षणापुरतीदेखील थांबण्यास तयार नसतात. त्यामुळे अपघाताची भीती व शक्यताही निर्माण होते. नागरिकांनी अहंकार बाजूला ठेवून सिग्नल जरी हिरवा असेल तर त्यावेळी थांबावे.