तालुक्याच्या ग्रामीण भागातही शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:14 AM2021-03-14T04:14:25+5:302021-03-14T04:14:25+5:30
गंगापूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने केेलेल्या आवाहनानुसार नाशिक तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील ग्रामीण भागातही अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता सर्व ...
गंगापूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने केेलेल्या आवाहनानुसार नाशिक तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील ग्रामीण भागातही अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता सर्व व्यवहार व व्यवसाय बंद ठेवण्यात आल्याने सर्वत्र शुकशुकाट पसरला होता.
कायम गर्दी असणाऱ्या गिरणारे, गंगापूर, गोवर्धन, दुगावी येथील अनेक व्यवसाय बंद ठेवण्यात आले होते. नाशिक तालुक्याच्या ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या कमालीची वाढत आहे. त्यामुळे हा संसर्ग रोखण्यासाठी पश्चिम पट्ट्यातील गावांमध्ये केवळ जीवनावश्यक किराणा, हॉटेल्स, मेडिकल, दवाखाने, भाजीपाला, दूध सोडून अन्य सगळे व्यवसाय बंद होते. एरवी रोज गिरणारेच्या बाजारात बस्त्यांची मोठी गर्दी असते. मात्र, शनिवारी बसस्थानकावर भाजी बाजार तुरळक भरला, तर छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलसह अन्य व्यापारी संकुले बंद होती. दुगाव ग्रामपंचायतीने ध्वनीक्षेपकावरून गावात जनजागृती केली. गोवर्धन, गंगापूरमध्येही अनेक व्यवसाय बंद होते.