गावे कोरोनामुक्त होऊनही शाळा बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:12 AM2021-07-01T04:12:14+5:302021-07-01T04:12:14+5:30
जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू करण्याबाबत शिक्षक व विद्यार्थी उत्सुक असल्याचेही या बैठकीदरम्यान समोर आले असून, यासंदर्भात स्वत: शिक्षणाधिकारी ...
जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू करण्याबाबत शिक्षक व विद्यार्थी उत्सुक असल्याचेही या बैठकीदरम्यान समोर आले असून, यासंदर्भात स्वत: शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर यांनी गेल्या आठवड्यात काही शाळांना भेटी देऊन पाहणी केली असता, त्यावेळी सुरक्षित अंतर राखून व कोरोनाचे नियम पाळूनही शाळा सुरू करता येतील अशी परिस्थिती दिसून आली आहे. काही शाळांच्या वर्गखाेल्या मोठ्या आहेत, तर काही शाळांना विस्तृत मैदान असल्याने ठराविक वेळेसाठी विद्यार्थी बोलविता येतील असे गावकऱ्यांचेही म्हणणे आहे. मात्र शासनाच्या आदेशाशिवाय शाळा सुरू करण्यास शिक्षण विभाग तयार नाही.
चौकट====
जबाबदारी कोण घेणार
जिल्ह्यातील ८६८ गावे कोरोना मुक्त असल्यामुळे अशा गावांमध्ये शाळा सुरू करण्याबाबत गावकऱ्यांनी अनुकूलता दर्शविली असली तरी, संभाव्य तिसऱ्या लाटेच्या भीतीमुळे शिक्षण विभाग कचरत आहे. एखाद्या विद्यार्थ्याला दुर्दैवाने कोरोनाची लागण झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.