मानोरीत आजही १५० वर्षापूर्वीची घरे मजबूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 06:19 PM2018-09-12T18:19:47+5:302018-09-12T18:34:30+5:30
मानोरी : आजच्या युगात प्रत्येक व्यक्तीला वाटते की आपल्याला राहायला आपल्या हक्काचे पक्के घर, स्लॅबचे आलिशान बंगले असावे. परंतु ग्रामीण भागात आज ही सन १८५० पासून ते २०१८ या वर्षी पर्यंतची १५० ते २०० वर्षांपासून ची दगड मातीची धाबे घर जशीच्या तशी मजबूत अवस्थेत उभी आहे. माती गोळा करून त्याचा मोठा चिखल तयार केला जात असे. आणि या चिखलाच्या आधारावर मोठ मोठे दिमाखदार राज दरबार, मोठ्या कुटुंबाचे वाडे मातीच्या चिखलापासून तयार केले जात होते.
लोकमत न्यूज नेटवर्क

अलीकडच्या पंधरा ते वीस वर्षांपासून या मातीच्या घरात बदल होत चालले असून पत्र्याचे, विटा, सिमेंट, वाळू यांच्या पासून मोठ्या प्रमाणात पक्की घरे उभी राहिली आहे. येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथील अनेक नागरिकांकडे अजूनही १५० ते २०० वर्षांपासूनची मातीची घरे अस्तित्वात आहे. वर्षभरात अनेक प्रकारचे सण, उत्सव मोठ्या थाटामाटात साजरे केले जातात. दिवाळी, दसरा, पोळा, गुढीपाडवा यासारखे सण साजरे करताना अनेक नागरिक आपल्या घरांना रंगिबेरंगी लाईट, रांगोळी काढून सण साजरे करतात. परंतु येथील काही भागातील अनेक घरे हे सण साजरे करताना धाबेघरात राहणाऱ्या गृहिणी आपल्या मातीच्या घराला सफेद मातीचा लेप लावून घराची शोभा वाढवत असतात. घरासमोर सारवून त्यावर रांगोळी काढली जाते. त्यामुळे बहुतेक आदिवासी भागातील बांधवांना आपल्या हक्काची पक्की घरे नसल्याने अजूनही बेघर असल्याचे दिसून येत आहे.
परंतु अशा मातीच्या घरमालकांना प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेअंतर्गत प्रत्येकाला आपल्या मालकीचे पक्के घर मिळवून देण्यासाठी येवला तालुक्यातील प्रत्येक गावात सर्वेक्षण सुरु आहे. यात पत्र्याचे, वीट, सिमेंटचे पक्के घर या योजनेतून मिळणार आहे.
फोटो : मानोरी बु येथील 150 वर्षांपूर्वीचे धाब्याचे घर