यंदाही मुलीच ठरल्या हुशार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 09:42 PM2020-07-30T21:42:56+5:302020-07-31T01:35:48+5:30
नाशिक : राज्य शिक्षण मंडळातर्फे मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल बुधवारी (दि. २९) आॅनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली. जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : राज्य शिक्षण मंडळातर्फे मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल बुधवारी (दि. २९) आॅनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली. जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.
केबीएच विद्यालय मालेगाव : तालुक्यातील वडेल येथील केबीएच माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९७.९५ टक्के लागला. प्रांजली दिगंबर कुंवर हिने ९१.८० टक्के गुणांसह प्रथम, कोमल नरेंद्र शेलार याने ९१ टक्के गुणांसह द्वितीय, तर प्रांजल रवींद्र बच्छाव हिने ९०.४० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला.
कॅम्पातील केबीएच माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९८.३७ टक्के लागला. अथर्व प्रवीण नेरकर ९९.४० टक्के गुणांसह प्रथम, यश अमोल गुंजाळ ९७.६० टक्के गुणांसह द्वितीय तर तेजस शांतीलाल जोशी याने ९७.२० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला.
टाकळीचा ९६.४९ टक्के निकाल
मालेगाव : तालुक्यातील टाकळी येथील केबीएच विद्यालयाचा माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल ९६.४९ टक्के लागला. दिव्यानी संदीप शेवाळे हिने ८८.२० टक्के गुणांसह प्रथम, मनस्वी विजय अहिरराव हिने ८७.६० टक्के गुणांसह द्वितीय तर निकिता शरद शेवाळे हिने ८७.६० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला.
बालसंस्कार सेमी इंग्लिश स्कूल
मालेगाव : तालुक्यातील करंजगव्हाण येथील बालसंस्कार सेमी इंग्लिश स्कूलचा निकाल शंभर टक्के लागला. प्रेरणा ग्यानदेव डापसे या विद्यार्थिनीने ८८.२० टक्के गुण मिळवून स्कूलमध्ये तसेच करंजगव्हाण केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला. कोमल संतोष देवरे या विद्यार्थिनीने ८७ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला.
एलव्हीएच विद्यालय
मालेगाव : कॅम्प येथील एलव्हीएच विद्यालयाचा दहावीचा निकाल ९७.३३ टक्के लागला. विद्यालयातील २५ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले. वंदना जुन्या वळवी या विद्यार्थिनीने ८७ टक्के गुण मिळवून प्रथम, चंद्रकला लक्ष्मण पवार हिने ८६.४० टक्के गुण मिळवून द्वितीय तर निकिता नामदेव गवळी या विद्यार्थिनीने ८४.८० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.
संस्कृती ससाणे प्रथम
मुखेड : येथील जनता विद्यालयाचा दहावीचा निकाल ९८.६२ टक्के लागला. विद्यालयात संस्कृती अनिल ससाने (८९.६०) प्रथम, पल्लवी परसराम दराडे, तृप्ती दत्तू दराडे, निकिता अनिल गोपाल (८९.४०) या तीन मुली द्वितीय तर स्वरूप बाबासाहेब काळे (८७.६०) तृतीय आला आहे.
वैनतेय विद्यालयाचा
निकाल ९४.६० टक्के
निफाड : येथील वैनतेय विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल ९४.६० टक्के लागला आहे. या विद्यालयाने याहीवर्षी यशाची परंपरा कायम ठेवली आहे. वैष्णवी मनोज लाहोटी ही विद्यार्थिनी ९८ टक्के गुण मिळवून या विद्यालयात प्रथम आली आहे. परीक्षेसाठी विद्यालयाचे ३८९ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.
यातील ३६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यातील विशेष प्रावीण्य श्रेणीत १७७ विद्यार्थी, प्रथम श्रेणीत ८६ विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत ८३ विद्यार्थी, तृतीय श्रेणीत २२ उत्तीर्ण झाले.
अमित ज्ञानेश्वर कापसे ९६.२० टक्के द्वितीय, विजया यशवंत कुंदे ९५.४० तृतीय, श्रावणी किरण सोनवणे - ९५.२० चतुर्थ, तर प्रथमेश प्रकाश वाळके ९५ टक्के गुण मिळवत पाचवा क्रमांक मिळविला.भुलेश्वर विद्यालयाचा निकाल ९७ टक्केअंदरसूल : अजिंक्यतारा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित भुलेगाव येथील श्री भुलेश्वर माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९७.८२ टक्के लागला आहे. विद्यालयात भक्ती गोसावी (८७) प्रथम, रोहित जगदाळे (८३.४०) द्वितीय, तर नम्रता खिल्लारे (८२) तृतीय आली.