गुरु नानकजींच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 11:07 PM2019-11-10T23:07:49+5:302019-11-11T01:17:08+5:30

शीख धर्माचे संस्थापक गुरूनानक देवजी यांच्या ५५०व्या जयंतीनिमित्त गुरूगोविंद सिंग फाउंडेशनच्या परिसरात ‘सतगुरू नानक प्रगटिया, मिटी धुंध जग चानण होया सह विविध भजनांचे सुमधुर कीर्तनांचा लाभ घेण्यासाठी शीखबांधवांनी गुरुगोविंद सिंग फाउंडेशन येथे सुरू असलेल्या प्रकाश पर्वात उत्स्फूर्तपणे उपस्थिती दर्शवली.

Event on the anniversary of Guru Nanakji | गुरु नानकजींच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम

गुरु नानकजींच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम

Next
ठळक मुद्देप्रकाश पर्व : भजन, कीर्तनासह विविध धार्मिक उपक्रम

इंदिरानगर : शीख धर्माचे संस्थापक गुरूनानक देवजी यांच्या ५५०व्या जयंतीनिमित्त गुरूगोविंद सिंग फाउंडेशनच्या परिसरात ‘सतगुरू नानक प्रगटिया, मिटी धुंध जग चानण होया सह विविध भजनांचे सुमधुर कीर्तनांचा लाभ घेण्यासाठी शीखबांधवांनी गुरुगोविंद सिंग फाउंडेशन येथे सुरू असलेल्या प्रकाश पर्वात उत्स्फूर्तपणे उपस्थिती दर्शवली.
शहरातील गुरूनानक देवजी सेवा असोसिएशनद्वारा साजऱ्या करण्यात येत असलेल्या ५५०व्या गुरूनानक जयंतीनिमित्त आयोजित दोन दिवसीय विशेष प्रकाश पर्वानिमित्त शीख कीर्तन जत्थाचे मुख्य कीर्तनकार भाई अमनदीप सिंघजी, भाई बलप्रित सिंघजी आणि भाई सीम्रनजीत सिंघजी यांनी आपल्या विशेष कीर्तनांद्वारे गुरूनानक देवजी यांच्या विचारांबद्दल आपल्या ओघवत्या वाणीद्वारे मार्गदर्शन केले. या सर्व कीर्तनांचा मतितार्थ असा होता की, गुरु नानक देवजी यांची शिकवण म्हणजे घराच्या दरवाज्यावर लावलेला दिवा आहे, जो घराच्या आत ही प्रकाश देतो आणि घराच्या बाहेरही प्रकाश देतो. मानवाचे अंतर्मनही अंतर्बाह्य प्रकाशमान करण्यासाठी त्यांची शिकवण आजही हरप्रकारे आपल्याला मार्गदर्शक आहे. सर्व शक्य मार्गांनी त्यांची सेवा करा. अशाने सौहार्दपूर्ण वातावरणाची निर्मिती होईल जी सर्व समाजाला तसेच देशाला स्वस्थ ठेवेल, असे यावेळी कीर्तनात सांगण्यात आले. या प्रकाश पर्व सोहोळ्यामध्ये आमदार सीमा हिरे, स्कूल आॅफ आर्टिलरीचे कमांडंट लेफ्टनंट जनरल सलारिया, नगरसेवक अ‍ॅड. श्याम बडोदे, वाघ एज्युकेशन सोसायटीचे ट्रस्टी समीर वाघ यांनीदेखील विशेष उपस्थिती लावली. यावेळी गुरुगोबिंद सिंघ फाउंडेशनचे अध्यक्ष गुरदेव सिंघ बिर्दी, सचिव बलबीर सिंघ छाब्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी परिमंदर सिंग तसेच गुरुनानक देवजी सेवा असोसिएशनच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य, फाउंडेशनच्या सर्व शैक्षणिक संस्थेचे कर्मचारी तसेच शहरातील शीख बांधव, उपस्थित होते.
मनुष्याने नेहमी सत्कर्म करावे
यावेळी कीर्तनात सांगण्यात आले की, राष्ट्रीय एकात्मतेला पोषक वातावरण निर्माण होईल यासाठी मनुष्याने नेहमी चांगले कर्म करत रहा, मनुष्याने मनुष्याशी मनुष्यासारखे वागले पाहिजे. जात, पंथ, धार्मिक मतभेद दूर करण्यासाठीच गुरूनानकजी यांनी लंगरची प्रथा सुरू केली. जिथे कोणताही भेदभाव न होता सर्वजण एका पंगतीत बसून अन्नग्रहण करतात. गुरूची शिकवण मनुष्याला नेहमीच सर्वांगीण विकासाला पोषक ठरते असे मार्गदर्शन या कथा कीर्तनाद्वारे लाभले.

Web Title: Event on the anniversary of Guru Nanakji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.