स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त दिंडोरी महाविद्यालयात कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:17 AM2021-08-14T04:17:58+5:302021-08-14T04:17:58+5:30
विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. प्रल्हाद दुधाने आणि राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. नाना चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या ...
विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. प्रल्हाद दुधाने आणि राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. नाना चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमात प्रा. चंद्रप्रकाश कांबळे यांचे ऑनलाईन व्याख्यान पार पडले. क्रांतिवीर वसंतराव नाईक आणि वीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस प्राचार्य डॉ. संजय सानप आणि उप-प्राचार्य डॉ. सुनील उगले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रा. कांबळे यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा आढावा घेतला आणि त्यात क्रांतिवीर वसंतराव नाईक यांचे स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे स्पष्ट केले. अध्यक्षीय मनोगत प्राचार्य डॉ. सानप यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. प्रल्हाद दुधाने यांनी तर आभार प्रा. नाना चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमास प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
फोटो - १३ दिंडोरी कॉलेज
दिंडोरी येथील महाविद्यालयात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमप्रसंगी प्राचार्य डॉ. संजय सानप, उपप्राचार्य डॉ. सुनील उगले व प्रा. चंद्रप्रकाश कांबळे आदी.
130821\13nsk_2_13082021_13.jpg
दिंडोरी येथील महाविद्यालयात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमप्रसंगी प्राचार्य डॉ. संजय सानप, उपप्राचार्य डॉ. सुनील उगले व प्रा. चंद्रप्रकाश कांबळे आदी.