अखेर हरणबारीचे एक आवर्तन सुटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2022 01:19 AM2022-02-12T01:19:36+5:302022-02-12T01:19:52+5:30
रब्बी हंगामासाठी फेब्रुवारी महिना अखेर हरणबारी धरणातून एक आवर्तन सोडण्यात येणार आहे. या आवर्तनात नदीकाठच्या १ हजार २०० हेक्टर क्षेत्राला याचा लाभ होणार आहे.
मालेगाव : रब्बी हंगामासाठी फेब्रुवारी महिना अखेर हरणबारी धरणातून एक आवर्तन सोडण्यात येणार आहे. या आवर्तनात नदीकाठच्या १ हजार २०० हेक्टर क्षेत्राला याचा लाभ होणार आहे. हरणबारी धरणातून दोन आवर्तन यापूर्वी सोडण्यात आल्याने २५० दलघफू जलसाठा संपुष्टात आला आहे. सद्या धरणात ८७५ दलघफू पाणी शिल्लक आहे. फेब्रुवारी अखेर एक आवर्तन दिले जाणार आहे. उर्वरित ४०० दलघफू जलसाठा जिल्हाधिकारी कार्यलयाने मे अखेर निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईच्या काळासाठी आरक्षित केला आहे. तिसरे आवर्तन रब्बी पिकांसाठी दिले जाणार आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पाणी सोडण्यात येईल. हरणबारीचे आवर्तन मोसम माळ कालव्यापर्यंत देण्यात येते. याचा फायदा बाराशे हेक्टर शेती क्षेत्राला होत असतो.