अखेर शिवाजी उद्यानाचे बदलणार रूपडे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 01:20 AM2018-12-15T01:20:16+5:302018-12-15T01:20:42+5:30

शहराच्या विविध भागांत चारशेहून अधिक उद्याने साकारण्यात आली, परंतु नगरपालिका काळापासून असलेले जुन्या शिवाजी उद्यानाला मात्र अवकळा आली. सीबीएससारख्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या उद्यानाची अवकळा आता थांबणार असून, सुमारे चार कोटी रुपये खर्च करून नूतनीकरण करण्यात येणार आहे.

Eventually, change of Shivaji Park will transform! | अखेर शिवाजी उद्यानाचे बदलणार रूपडे !

अखेर शिवाजी उद्यानाचे बदलणार रूपडे !

Next
ठळक मुद्देमहासभेत प्रस्ताव : चार कोटी रुपयांचा खर्च

नाशिक : शहराच्या विविध भागांत चारशेहून अधिक उद्याने साकारण्यात आली, परंतु नगरपालिका काळापासून असलेले जुन्या शिवाजी उद्यानाला मात्र अवकळा आली. सीबीएससारख्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या उद्यानाची अवकळा आता थांबणार असून, सुमारे चार कोटी रुपये खर्च करून नूतनीकरण करण्यात येणार आहे.
महापालिकेची महासभा येत्या दि. १९ डिसेंबर रोजी होणार असून, त्यात हा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी मांडण्यात आला आहे. याशिवाय शहरात चुंचाळे, सिडकोतील पाटीलनगर येथील जुन्या मलजल केंद्रासह अनेक ठिकाणी क्रीडांगणे विकसित करण्याचे कोट्यवधी रुपयांचे प्रस्ताव मांडण्यात आले आहेत.
शहरातील मध्यवर्ती आणि नगरपालिका काळापासून असलेल्या शिवाजी उद्यानाचे नामकरण स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या हस्ते झाले आहे. मध्यवर्ती ठिकाणी तीन ते साडेतीन एकर जागेत असून, या उद्यानाकडे महपालिकेने लक्ष पुरवले नाही. मध्यंतरी मनसेच्या काळात खासगीकरणातून उद्यान विकसित करण्यासाठी काही उद्योगांच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली, परंतु उपयोग झाला नाही. वनखात्याच्या अखत्यारितील वनौषधी उद्यानाचा विकास महापालिकेने केला, परंतु शिवाजी उद्यानाकडे दुर्लक्ष झाले होते. आताही स्मार्ट सिटी योजनेत नेहरू उद्यानाचे नूतनीकरण करण्यात आले, तर अमृत योजनेअंतर्गत तवली फाटा आणि दसक येथील उद्यान विकसित करण्यात आले. परंतु शिवाजी उद्यानाकडे लक्ष पुरवले नव्हते. मात्र आता नाशिक महापालिकेने अमृत योजनेच्या दुसºया टप्प्यात याच उद्यानाच्या नूतनीकरणाचा निर्णय झाला असून, ४ कोटी ६ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. याशिवाय याच महासभेत अन्य अनेक उद्याने आणि क्रीडांगणांचे प्रस्ताव आहेत. पेलिकनच्या जागी सेंट्रल गार्डन तयार करण्याची तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांची योजना होती. त्यानुसार ३२ कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव महासभेत मांडण्यात आला आहे.
मगर यांना कार्यमुक्त करण्याचा प्रस्ताव
च्नाशिक महापालिकेच्या संगणक विभागाचे अभियंता प्रशांत मगर यांनी स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज दिला असून, तो प्रशासनाने मंजुरीसाठी महासभेवर ठेवला आहे. अर्थात, सध्या स्मार्ट सिटीची कामे सुरू असून प्रशासनाकडे अधिकाºयांची कमतरता असल्याने मगर यांना स्वेच्छानिवृत्त करण्यास परवानगी देऊ नये, असे प्रशासनाने प्रस्तावात म्हटले आहे.
मनपा बॉक्स क्रिकेट साकारणार
च्महापालिकेच्या वतीने गोविंदनगर येथील चौक नंबर चारमधील मोकळ्या जागेवर बॉक्स क्रिकेटचे क्रीडांगण विकसित करण्याचा प्रस्ताव प्रथमच सादर करण्यात आला आहे.

Web Title: Eventually, change of Shivaji Park will transform!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.